फोटो सौजन्य - freepik
अकोला : पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत. त्यामुळे आता गावांमध्ये आणि शहरांमध्ये गढूळ आणि दूषित पाण्यामुळे नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. शहरांमध्ये आणि राज्यामध्ये रोगराईचे प्रमाण वाढले आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार अकोल्या जिल्ह्यामध्ये घडला आहे. अकोला जिल्ह्यातील बार्शिटाकळी तालुक्यातील सराव गावामध्ये दूषित पाण्यामुळे गावातील नागरिकांना मळमळ, उलट्या आणि अतिसार असा प्रकारचे १०० हुन अधिक रुग्ण आढळले आहेत. या गावामध्ये पावसामुळे तेथील घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
अकोला जिल्ह्यातील गावामध्ये आरोग्य पथक आल्यानंतर १६५ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये ५९ पेक्षा जास्त नागरिकांना ‘डायरिया’ ची लक्षणे आढळून आली आहेत. त्यामुळे गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभाग पथकाने या गावाला भेट देऊन तेथील १६५ घरांचे सर्वेक्षण केले. गावामधील ५९ पेक्षा जास्त रुग्णांमध्ये डायरियाची लक्षणे आढळून आहेत आहेत. त्यामुळे त्या रुग्णांना फक्त सलाइन लावण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर पत्रकारांची टीम गावात पोहचताच आरोग्य विभागाचे टीम आणि अधिकारी आणि जिल्हा परिषद CO गावात दाखल झाले आहेत.
अकोला जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारची दाखल मागील चार ते पाच दिवसांपासून घेण्यात आली नाही असा आरोप गावातील नागरिकांनी केला आहे. त्याचबरोबर त्यांचे म्हणणे आहे की, वारंवार तक्रार करूनही संपूर्ण गावाला गढूळ पाणी प्यावे लागत आहे, त्याचबरोबर गावाला पाणीपुरवठा करणारी पाण्याची टाकी स्वच्छ केली गेली नाही. प्रशासनाच्या या कारभारामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस रोगराईचे प्रमाण वाढत चालले आहे. हे फक्त अकोला जिल्ह्यामध्येच नाही तर शहरांमध्ये सुद्धा रोगराईचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांना दवाखाने आणि रुग्णालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. प्रशासनाने या घटनेकडे दुर्लक्ष करू नये अशी नागरिकांची मागणी आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये रोगराई पसरण्याचे चान्स जास्त असतात त्यामुळे आरोग्य विभागाने याकडे लक्ष द्यावे.