चिखलदरा : मागील एका आठवड्यापूर्वी चिखलदरा (Chikhardara) पासून काही अंतरावर आलाडोह (Aladoh) निवासी तूषार गायन या व्यक्तीस शाहपूर जवळ (Near Shahpur) वाघाचे दर्शन (Sightings a tiger) झाले होते. त्याची माहिती गाविलगड वनपरिक्षेत्र अधिकारी दिनेश वाळके (Gavilgarh Forest Officer Dinesh Walke) यांना देण्यात आली होती. वाळके यांनी परिसरात पाहणी केली, असता वाघाचे लोकेशन आमझरी पासून २ किमी अंतरावर असल्याची माहिती वन कर्मचाऱ्यांना प्राप्त झाली. त्यामुळे वन विभागाने ट्रॅप कॅमेरे (Trap cameras) लावले होते. मात्र, हाच वाघ सहाय्यक वनपरीक्षेत्र अधिकारी विनोद कास्देकर यांना गाविलगड किल्लात आढळून आला.
रविवारी (७ ऑगस्ट) ११ वाजता सहाय्यक वनपरीक्षेत्र अधिकारी विनोद कास्देकर हे त्यांच्या सहकारी वन कर्मचाऱ्यांसह ऐतिहासिक गाविलगड किल्ला (Gavilgarh Fort) येथे गेले होते. दरम्यान, अचानक वाघ त्यांच्या समोर येत असल्याचे दिसून आहे. कास्देकर यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात वाघाचे छायाचित्र (Photo tiger in camera) कैद केले. वरिष्ठ वन अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली. आढळून येत असलेला वाघ गाविलगड किल्लात राहणाऱ्या वाघिणीचे पिल्लू असल्याची माहिती समोर आली आहे.
वाघीणीने एकूण चार पिल्लांना जन्म दिला होता. दिसून येत असलेला वाघ हा त्याच शावकांपैकी एक आहे. त्याचे वय एक ते दोन वर्ष असण्याची शक्यता आहे. २ वर्षाचा झाल्यानंतर हा परिवार विभक्त होतो. वन विभागाकडून लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात देखील हा वाघ कैद झाला आहे. सद्यस्थितीत या परिसरात वन्यजीवांच्या मृत्यूची माहिती समोर आलेली नाही. वन परिक्षेत्र अधिकारी वाळके या स्थितीवर लक्ष ठेऊन आले.
काही वन मजुरांसह किल्ल्यात गस्तीवर असताना अचानक गाविलगड परिसरात वाघ दिसून आला. त्याचे छायाचित्र कॅमेऱ्यात कैद केले आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे.
– विनोद कासदेकर, सहायक वनपरिक्षेत्र अधिकारी (गाविलगड)