मयुर फडके, मुंबई : झोपडपट्टी पुनर्विकास (झोपु) घोटाळा प्रकरणात (Slum Redevelopment Scam Case) मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Former Mayor of Mumbai Kishori Pednekar) यांना मुंबई उच्च न्यायालयाने (High Court) दिलासा (Relief) दिला आहे. या प्रकरणात पुढील आदेश येईपर्यंत (Until further orders) पेडणेकर यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करू नये (Charge sheet should not be filed against Pednekar), असे आदेश मंगळवारी न्यायालयाने मुंबई पोलिसांना (Mumbai Police) दिले आहेत.
वरळी येथील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातील (एसआरए) सदनिका बनावट कागदपत्रांचा वापर करून विकत घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी उच्च न्यायालयात केली आहे.
आपल्याविरोधात निर्मलनगर पोलीस ठाण्यात केलेली तक्रार ही खोटी आणि अर्थहीन असल्याचा दावा याचिकेत केला असून ही तक्रार बदनामीकारक, राजकीय हेतूने प्रेरित आणि कुहेतूने केली आहे. आपल्याला खोट्या तक्रारीत गोवण्यात आले आहे. भादंवि संहितेच्या विविध गुन्ह्यातर्गंत तक्रार नोंदवण्यात आली असून प्रथमदर्शनी गुन्हा सिद्ध होत नाही, म्हणूनच सत्र न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे निर्मलनगर पोलीस ठाण्यात दाखल तक्रार रद्द करण्यात यावी आणि या प्रकरणाशी संबंधित सर्व फौजदारी कारवाईला स्थगिती द्यावी, अशी मागणीही पेडणेकर यांनी याचिकेतून केली आहे.
[read_also content=”सावधान! झारखंडमध्ये हत्तींनी मांडलाय उच्छाद, एवढ्या लोकांचा घेतलाय जीव की सरकारने लागू केलीये जमावबंदी https://www.navarashtra.com/india/too-much-horrible-an-elephant-attack-killed-16-people-in-12-days-in-ranchi-jharkhand-nrvb-371360.html”]
याचिकेवर मंगळवारी न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर सुनावणी झाली. तेव्हा, न्यायालयाने याचिकाकर्त्यांची बाजू मान्य करत पुढील आदेशापर्यंत याचिकाकर्त्यांविरोधात आरोपपत्र दाखल करू नका, असे आदेश पोलिसंना देऊन खंडपीठाने सुनावणी ३० मार्च रोजी निश्चित केली.
वरळी येथील गोमाता जनता झोपु गृहनिर्माण संस्थेत बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक करून सदनिका घेतल्याचा आरोप करत पेडणेकर यांच्या मुलासह तिघांविरोधात एसआरएच्या अधिकाऱ्याने निर्मल नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून गुन्हा दाखल केला होता.
[read_also content=”तिनं विराट कोहलीला खुल्लम खुल्ला केला ‘किस’! आणि अनुष्काचा चढला पारा; पुढं जे झालं ते तुम्हीच वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/viral/girl-kissing-virat-kohlis-statue-anushka-get-angry-video-goes-viral-on-social-media-nrvb-371345.html”]
तक्रारीनुसार, पेडणेकर यांनी वरळी येथील सोसायटीत गंगाराम बोगा या नावाने सदनिका घेतली. २००८ मध्ये ही सदनिक बोगा याला देण्यात आली होती मात्र, २०१७ च्या महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना पेडणेकर यांनी प्रतिज्ञापत्रात ही मालमत्ता नमूद केली होती त्यांनतर ही बाब उघडकीस आली होती.