महाकुंभमध्ये महाराष्ट्रातील माजी महापौरांचं निधन; प्रयागराजमध्ये स्नान करताना हार्ट अटॅक
Mahesh Kothe Died : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. सोलापूर महानगरपालिकेचे माजी महापौर महेश कोठे यांचं आज महाकुंभमध्ये निधन झालं. प्रयागराजमध्ये स्नान करताना त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं सांगितलं जात आहे. महेश कोठे यांच्या निधनाची बातमी समजताच सोलापूरवर शोककळा पसरली आहेु. थंडीत रक्ताच्या गुठळ्या झाल्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं सांगितलं जात आहे.
Santosh Deshmukh News: वाल्मिक कराडचा पाय खोलात; ‘MCOCA’ लावण्याची कारवाई सुरू
महेश कोठे त्यांच्या काही मित्रांसह कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी गेले होते. त्यांनी गंगा नदीत शाही स्नान केलं, त्यानंतर थंडीमुळे त्यांचे रक्त गोठले आणि त्याच वेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्याला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
महेश कोठे हे विष्णुपंत कोठे यांचे मित्र होते. विष्णुपंत कोठे आणि महेश कोठे हे माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांचे कट्टर विश्वासू मानले जात होते. सोलापूरमध्ये काँग्रेसला बळकटी देण्यात आणि सोलापूर महापालिकेत काँग्रेसला सत्तेत आणण्यात कोठे कुटुंबाची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. महेश कोठे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधून शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला होता. महेश कोठे यांच्या अकाली निधनाने सोलापूरच्या राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महेश कोठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.
‘…तर तुम्ही असं कधीच म्हटलं नसतं.’; वाल्मिक कराडच्या आईला अंजली दमानियांचे प्रत्युत्तर
महेश कोठे यांनी भाजपच्या विजयकुमार देशमुख यांना कडवी टक्कर दिली होती. त्यांनी सोलापूर महानगरपालिकेत महापौरपद भूषवले. संपूर्ण महाराष्ट्रात ते एक अनुभवी नगरपालिका नेते म्हणून ओळखले जात होते. महापालिकेत व्यापक अनुभव असलेल्या नेत्याच्या आकस्मिक निधनाने सोलापूरवर शोककळा पसरली आहे. त्यांचं पार्थिव विमानाने सोलापूरला आणण्यात आले आहे.
नुकत्याच झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून कोठे (Mahesh Kothe) यांनी निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणुकीत त्यांना अपयश आलं तरी त्यांनी कडवी झुंज दिली होती. आतापर्यंत त्यांनी तीनवेळा विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचं आमदार होण्याचं स्वप्न अपुरे राहिले. काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी महापालिकेचे महापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते अशी अनेक पद भूषवली. महापालिकेत त्यांचा मोठा दबदबा होता.
सोलापूर महापालिकेचे अनेकवेळा बजेट सादर करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर होता. प्रत्येक बजेटवर ते अभ्यासू भाषण करत. कोठे यांच्या निधनामुळे राजकीय तसेच समाजिक क्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे. कोठे यांचे पार्थिक विशेष विमानाने सोलापुरात आणले जाणार आहे. मुरारजी पेठ येथील ‘राधाश्री’ निवास्थानी त्यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवले जाणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा नगरसेवक प्रथमेश कोठे आहे.