एसआरए फ्लॅट घोटाळा (SRA scam case) प्रकरणात अडकलेल्या मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Former Mumbai mayor Kishori Pednekar )यांचा त्रास कमी होण्याचे नाव घेत नाहीये. एसआरए फ्लॅट घोटाळ्याप्रकरणी समन्स मिळाल्यानंतर पेडणेकर मुंबईतील दादर पोलीस ठाण्यात पोहचल्या , जिथे त्यांची दोन तास चौकशी करण्यात आली आहे. किशोरी पेडणेकर या शिवसेनेच्या (ठाकरे गट) नेत्या आहेत.
चौकशीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आरोप एका पक्षाच्या वरीष्ठ नेत्याने केला आहे. प्रत्येक आरोपाला उत्तर दिले पाहीजे असे नाही. पोलिसांनी जे प्रश्न विचारले त्याची मला माहीत असलेली उत्तरे दिली आहेत. मी कायद्याची लढाई लढत आहे. आरोपामध्ये १० टक्केही सत्य नाही. साप समजून दोरी बडवण्याचा प्रकार सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
प्रत्येक आरोपाला उत्तर दिले पाहिजे असे नाही. कर नाही त्याला डर कशाला अशी म्हण आहे त्याप्रमाणे मी आले, आम्ही बराच वेळ बसलो होतो त्यात बराच वेळ गप्पांमध्ये वेळ गेला. जे रंगवल जात आहे त्यातील १० टक्केही खरे नाही. मला कोणी मेसेज केला मी तो वाचला का? ज्याने मेसेज केला त्याला उत्तर देण्यास बांधिल मी बांधील नसल्याचे ही त्या म्हणाल्या.
दरम्यान, दादर पोलिस ठाण्यात आज (दि.१) दुसऱ्यांदा किशोरी पेडणेकर यांची चौकशी करण्यात आली. दरम्यान त्या चौकशी नंतर बाहेर आल्यावर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली तसेच त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत.