मुंबई: जून महिन्यात दहावी-बारावीचा (SSC -HSC Exam) निकाल जाहीर झाला. या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट महिन्यात घेण्यात येणार आहे.(HSC Exam Update) या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी 10 मिनिटे जास्त वेळ देण्यात येणार आहे. (SSC Exam Update)
पूर्वी मार्चमध्ये होणाऱ्या परीक्षेत 10 मिनिटे वेळ प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी दिला जायचा. मात्र वाढत्या कॉपीच्या प्रकारामुळे 2022-23 च्या परीक्षेत हा वेळ काढून टाकण्यात आला. पण या गोष्टींचा पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी विरोध केला. त्यामुळे पुन्हा एकदा हा वेळ पुरवणी परिक्षेत दिला जाणार आहे. या वेळेमुळे विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी थोडा जास्त वेळ मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नागपूर, मुंबई (Mumbai), लातूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, कोकण, अमरावती आणि नाशिक या नऊ मंडळातर्फे दहावी (SSC) बारावीची पुरवणी परीक्षा (Exam) होणार आहे. ही परीक्षा जुलै-ऑगस्ट 2023 मध्ये होणार आहे.
[read_also content=”मी कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही, ही माझी चूक आहे का, अजित पवारांचा शरद पवारांना थेट सवाल https://www.navarashtra.com/maharashtra/i-am-not-born-to-anyone-is-it-my-fault-ajit-pawars-direct-question-to-sharad-pawar-82-years-when-will-it-stop-bless-me-now-ajit-pawars-speech-nrab-427808.html”]
इयत्ता बारावीसाठी लेखी परीक्षा मंगळवारी 18 जुलै 2023 ते मंगळवार 8 ऑगस्ट 2023 या कालावधीत होणार आहे. तसेच इयत्ता बारावीची उच्च माध्यमिक प्रमाणपत्र लेखी परीक्षा मंगळवार 18 जुलै 2023 ते शनिवार 5 ऑगस्ट 2023 या कालावधीत घेतली जाणार आहे. बारावीच्या कला वाणिज्य आणि विज्ञान अशा तिन्ही शाखांचे सविस्तर वेळापत्रक तुम्हाला बोर्डाच्या संकेतस्थळावर पाहायला मिळेल.
तर दहावीची परीक्षा 18 जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. दहावी पुरवणी परीक्षेचं वेळापत्रक www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर प्रदर्शित झाले आहे.