पुणे: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार न मिळाल्याने एका गर्भवती महिलेचा मुत्यू झाल्याची घटना घडली आहे. यानंतर मंगेशकर रुग्णालयावर हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला जात आहे. मात्र डिपॉझिट न भरल्याने त्या गर्भवती महिलेला उपचार मिळाले नाहीत आणि त्या महिलेचा उपचारांअभावी मृत्यू झाला. संपूर्ण राज्यभरातून या घटनेवर संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान आता पोलिसांनी दीनानाथ मंगेशकर परिसरात जमावबंदीचे आदेश दिले आहेत.
गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणानंतर दिनानाथ मंगेशकर रुग्णालय परिसरात गेल्या काही दिवसांपासून आंदोलने होत आहेत. त्यामुळे या परिसरात तणावाचे वातावरण असते. यापार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये यासाठी पुणे पोलिसांनी या परिसरात जमावबंदीचे आदेश काढले आहेत. गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर रुग्णालयासमोर विविध राजकीय पक्ष तसेच संस्था व संघटनांकडून रुग्णालयाबद्दल विरोध केला जात आहे. रुग्णालयाच्या दारात आंदोलन केले जात आहे. आंदोलनात नावाला काळे फासणे, शाई फेकने, चिल्लर फेकण्याच्या घटना घडल्या. तर, रुग्णालयाच्या टेरेसवर जाऊन आंदोलन करण्यात आले. यामुळे येथे येणाऱ्या रुग्णांनाही याचा त्रास होतो. सोबतच परिसरात गर्दी होते. परिणामी वाहतूक कोंडीही होते. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी दीनानाथ रुग्णालय परिसरात जमावबंदीचे आदेश दिले आहेत. याबाबतचे आदेश सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिले.
महापालिकेचे खासगी रुग्णालयांना महत्वाचे निर्देश
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गभर्वती महिलेचा डिपॉझिट न भरल्याने उपचारांअभावी मृत्य झाला. त्यानंतर आता पुणे महानगरपालिका सतर्क झाली आहे. पुणे महानगरपालिकेने सर्व खासगी रुग्णालयांना डिपॉझिट घेऊ नये अशी नोटीस बजावली आहे. आधी रुग्णावर उपचार करावेत आणि मग त्यांच्याकडे पैसे मागावेत असे आदेश या नोटिसीमधून देण्यात आले आहेत.
गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी डॉ. घैसास यांचा राजीनामा
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात एक गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. या प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रूग्णालयातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मंगेशकर रूग्णालय प्रशासनाच्या प्रतिमेला सुरुंग लावणाऱ्या घटनांमुळे आणि त्यामुळे रूग्णांची होणारी गैरोसी पाहता डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी आपल्या पदाचा स्वेच्छेने राजीनामा दिला आहे.
Big Breaking: मंगेशकर रूग्णालयातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी डॉ. घैसास यांचा राजीनामा
डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी आपल्या पदाचा राजीनामा रूग्णालय प्रशासनाला सुपूर्त केला आहे. घैसास यांनी राजीनामा देताच वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. डॉक्टर घैसास हे अत्यंत अनुभवी आणि कुशल डॉक्टर म्हणून प्रसिद्ध होते. डॉक्टर घैसास यांनी रूग्णाला उपचारांसाठी अनामत रकमेची मागणी केल्याचा आरोप त्यांच्यावर होता.
भाजप आमदाराच्या ‘पीए’लाच फटका, गर्भवतीचा मृत्यू
सुशांत भिसे हे भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहतात. त्यांची पत्नी तनिषा या सात महिन्यांच्या गर्भवती होत्या. दरम्यान अचानक रक्तस्त्राव होऊ लागल्याने त्या तत्काळ जवळ असलेल्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी गेल्या होत्या. परंतु, त्यांना क्रिटीकल परिस्थिती असून, डिपॉझिट म्हणून १० लाख रुपये भरा असे सांगितले. तरच पुढील प्रक्रिया सुरू करू म्हणून उपचारासाठी दाखल करून घेतले नाही. त्यांनी ३ लाख रुपये भरण्याची तयारी दाखवली. नंतर मुख्यमंत्री सहाय्यता कक्षातून रुग्णालय प्रशासनाला संपर्क देखील करण्यात आला.