मुंबई : राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (National Pension Scheme) आणि जुनी निवृत्तीवेतन योजनेचा (Old Pension Scheme) तुलनात्मक अभ्यास (A Comparative Study) करण्यासाठी तीन सदस्यीय समितीची स्थापना (Three Member Committee) करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी आज विधानसभेत केली. ही समिती तीन महिन्यात आपला अहवाल सादर करणार आहे.
या समितीमध्ये भारतीय प्रशासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी सुबोध कुमार, के.पी. बक्षी, सुधीरकुमार श्रीवास्तव यांचा समावेश असेल. तसेच लेखा व कोषागारे विभागाचे संचालक हे या समितीचे सचिव म्हणून काम पाहणार आहेत. ही समिती तीन महिन्यात उपाययोजनेबाबतची शिफारस-अहवाल शासनास सादर करेल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.
[read_also content=”शीतल म्हात्रे प्रकरणात नेमली जाणारी एसआयटी उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत असावी, शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांची मागणी; घेतली कल्याणमधील डायरे कुटुंबियांची भेट https://www.navarashtra.com/maharashtra/shiv-sena-leader-sushma-andhare-demands-that-the-sit-to-be-appointed-in-the-sheetal-mhatre-case-should-be-under-the-jurisdiction-of-the-high-court-took-a-visit-to-dyre-family-in-kalyan-nrvb-376139.html”]
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व त्यांच्याशी संलग्नित असणाऱ्या वेगवेगळया कर्मचारी संघटनानी राज्य शासनाला निवेदन देऊन जुनी निवृत्तीवेतन योजना त्वरित लागू करण्याची मागणी केली होती. या मागणीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री शिंदे यांनी याबाबत विधानसभेत निवेदन केले. यावेळी त्यांनी जुनी निवृत्ती योजना लागू करण्यासाठी संघटनांनी पुकारलेला संप मागे घ्यावा, असे आवाहन केले.
निवेदनात मुख्यमंत्री म्हणाले की, संघटनांच्या प्रलंबित मागण्यांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. राज्य शासनाच्या सर्व कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर सुरक्षित, सन्मानजनक व आरोग्य संपन्न जीवन व्यतित करता यावे, याकरीता आवश्यक असणाऱ्या सर्व उपाययोजना करण्यात येतील हे शासनाने तत्वत: मान्य केले आहे. संघटनेच्या मागणीनुसार या बैठकीमध्ये राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना व जुनी निवृत्तीवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी समिती नेमून, समितीने त्या अनुषंगाने शासनास अहवाल सादर करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
[read_also content=”जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी कल्याणमध्ये शिक्षकांचे काळ्या फिती लावून आंदोलन, महराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेने दिले तहसीलदार कार्यलयात निवेदन https://www.navarashtra.com/maharashtra/protest-of-teachers-wearing-black-ribbons-in-kalyan-to-implement-the-old-pension-scheme-maharashtra-state-shikshan-kranti-sanghatna-gave-a-statement-in-tehsildar-office-nrvb-376134.html”]
यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, शासन कर्मचाऱ्याच्या मागण्यांबाबत पूर्णपणे चर्चेला तयार असून सकारात्मक निर्णय घेण्याची शासनाची भूमिका आहे. हे लक्षात घेऊन या संपामुळे नागरिकांची ज्या काही अत्यावश्यक सेवा असतील त्या सेवांवर परिणाम होऊ नये, आरोग्य विभागातल्या रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी हा संप मागे घ्यावा, असे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.