उन्हाळ्याच्या सुट्टीत बाहेरगावी जाणाऱ्यांसाठी रेल्वेकडून खुशखबर; पश्चिम रेल्वेकडून 930 समर स्पेशल ट्रेन (File Photo : train)
नागपूर : ‘वंदे भारत’ एक्सप्रेससारख्या प्रीमियम रेल्वेगाडीवर दगडफेकीची घटना ताजी असतानाच आता नागपूरजवळील कामठी रेल्वे स्थानकाबाहेर हावडा एक्सप्रेसवर दगडफेक झाली. नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसवर देखील दगडफेक झाली होती. कामठी परिसरात ही घटना घडली.
रेल्वेवर दगडफेक झाल्याचे समजताच रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांनी तपास केला असता काही किशोरवयीन मुलांनी गाडीवर दगडफेकल्याचे दिसून आले. त्या मुलांनी खेळताना गाडीवर दगड फेकले होते. त्यांच्या पालकांना या घटनेचे गांभीर्य सांगून प्रकरण मिटवण्यात आले होते. शुक्रवारी अहमदाबादहून कामठी स्थानकावर येत असलेल्या अहमदाबाद-हावडा एक्सप्रेसवर दगडफेक करण्यात आली. ही गाडी कामठी स्थानकाजवळ असताना काहींनी दगड भिरकावले. अचानक दगड आल्याने नेमके काय होत आहे हे प्रवाशांना समजले नाही.
अहमदाबाद एक्सप्रेवरही दगडफेक
बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा रेल्वे स्थानकावर हावाडा अहमदाबाद एक्सप्रेसवर दगडफेक झाली होती. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या दगडफेकीत रेल्वेचे मोठे नुकसान झाले आहे. नांदुरा रेल्वे स्थानकावर दहा ते पंधरा जणांनी रेल्वेच्या एसी बोगीवर ही दगडफेक केली होती. काही प्रवाशी पेंट्री कारमध्ये जाऊन बसण्याचा प्रयत्न करत असल्याने काही कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवले.
सातत्याने केली जात आहे दगडफेक
भारतीय रेल्वेवर सातत्याने दगडफेक केली जात आहे. यापूर्वी अनेकवेळा अशा घटना घडल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आता अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसवर दगडफेक झाल्याची माहिती समोर आली आहे.
हेदेखील वाचा : वीजग्राहकांना लवकरच मिळणार दिलासा ! राज्यात वीजदर ‘इतक्या’ रुपयांनी होणार कमी