सणासुदीत साखरेचा गोडवा झाला कमी! ग्राहकांच्या बजेटवर वाढत्या दराचा भार; दर आणखी वाढण्याची शक्यता
सणासुदीचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच यवतमाळ जिल्हयातही साखरेच्या दराने ५० रुपयांचा टप्पा ओलांडल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या घरगुती बजेटवर अतिरिक्त भार पडण्याची शक्यता आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांत साखरेच्या दरात वाढ झाल्याने उत्सवांच्या गोडव्याला महागाईची कडू झळ पोहोचतांना दिसत आहे.(फोटो सौजन्य – istock)
जिल्हयात सर्व तालुक्यांमध्ये सद्या किरकोळ बाजारात साखरेचे दर ७० ते ७५ रुपये प्रति किलो तर घाऊक बाजारात ७हजार ५०० रुपये प्रति क्विंटल (७५ रुपये किलो) पर्यंत पोहोचले आहेत. पैन सणासुदीच्या काळात मागणी वाढल्याने आणि पुरवठ्यावरील ताणामुळे हे दर वाढले आहे. असे बाजारातील साखर विक्रेत्यांनी चर्चेत माहिती दिली. दरम्यान साखरेचा सरासरी किरकोळ दर वाढुन गेल्या महिन्याच्या तुलनेत सुमारे ६.६ टक्के, तर मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास ९ टक्के वाढ झाले आहे. जिल्ह्यातही सणासुदीच्या खरेदीला सुरुवात होत असताना साखरेच्या वाढलेल्या दराचा परिणाम जाणवू लागला आहे. आगामी गौरी-गणपती, दसरा आणि दिवाळी आणि इतर सर्व सणांमध्ये मिठाई, फराळ, लाडू तसेच विविध मिष्ठान खाद्यपदार्थ बनविण्यासाठी साखरेची मागणी वाढणार आहे. त्यामुळे किरकोळ बाजारातील दरांवर आणखी दबाव येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. साखर ही घरगुती वापरातील नियमित गरजेची वस्तू असल्याने दरवाढीचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या मासिक खर्चावर येत आहे.
दरम्यान साखरेच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर बाजारातील साठेबाजीला आळा घालण्यासाठी सरकारने पाऊले उचचली आहे. ठोक बाजारात साखर व्यापाऱ्यांच्या साठवणुकीवर मर्यादा लागू करण्यात आली आहे. १ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत साठा मर्यादा लागू राहणार करण्यात आली आहे. पुरेसा साखर साठा उपलब्ध राहावा, तसेच साखरेची कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये, यामुळे साठेबाजीवर आळा बसविण्यासाठी सरकारने ही पाऊले उचलली आहे.
समृद्धीवर ‘ब्रेकडाउन’ वाहनांना लगाम! अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर होणार कारवाई; आरटीओचा इशारा
साखरेच्या दरात अनाठायी वाढ होऊ नये, साखर दरवाढीचा फटका थेट घाऊक ग्राहकांना बसू नये, यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये साखरेचे किरकोळ दर, ठोक साखर व्यापाऱ्यांकडील साठा तसेच पुरवठ्याची परिस्थिती स्थानिक प्रशासनाने तपासावी, अशी अपेक्षा ग्राहकांकडून होत आहे.






