Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Politics: सातारकरांच्या स्वाभिमानासाठी अभयसिंह जगतापांना साथ द्या; महाविकास आघाडीची मतदारांना साद

सातारा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांच्या विजयासाठी शशिकांत शिंदे यांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून सत्ताधाऱ्यांवर पैशाच्या बळावर राजकारण केल्याचा आरोप केला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 09, 2026 | 09:27 PM
Satara Politics: सातारकरांच्या स्वाभिमानासाठी अभयसिंह जगतापांना साथ द्या; महाविकास आघाडीची मतदारांना साद
Follow Us
Follow Us:

 

  • सातारकरांच्या स्वाभिमानासाठी अभयसिंह जगतापांना साथ द्या
  • महाविकास आघाडीची मतदारांना साद
सातारा, दि. ९ (प्रतिनिधी): स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने साताऱ्यात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे उमेदवार अभयसिंह जगताप यांच्या विजयासाठी महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने मैदानात उतरल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासह आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना शशिकांत शिंदे यांनी सातारा जिल्हा परिषदेत घडलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य करत सत्ताधाऱ्यांवर टीका केली. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा असलेल्या सातारा जिल्ह्याचा स्वाभिमान जपण्यासाठी मतदारांनी सजग राहून मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले. लोकशाही मूल्यांवर आधारित राजकारणाला बळ देण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची असल्याचेही त्यांनी नमूद केले.

शिंदे म्हणाले की, कागदोपत्री संख्याबळ कमी असले तरी महाविकास आघाडीची ताकद जनतेच्या विश्वासात आहे. पैसा आणि सत्तेच्या बळावर नव्हे, तर लोकांच्या पाठिंब्यावर ही निवडणूक लढवली जात असून सातारकर मतदार योग्य निर्णय घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कराड उड्डाणपुलाच्या कामाची खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून पाहणी, कामाला गती देण्याच्या सूचना

उमेदवार अभयसिंह जगताप यांनीही यावेळी मतदारांशी संवाद साधला. साताऱ्याच्या विकासासाठी पारदर्शक, लोकाभिमुख आणि युवकांना संधी देणारे नेतृत्व उभे करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देत सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पत्रकार परिषदेत राज्य सरकारच्या शेतकरी धोरणावरही टीका करण्यात आली. कर्जमाफीच्या प्रश्नावर सरकारने दिलेली आश्वासने आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यामध्ये मोठी तफावत असल्याचा आरोप करण्यात आला. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरसकट कर्जमाफीची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

दरम्यान, साताऱ्यासह इतर जिल्ह्यांमध्येही महाविकास आघाडीच्या बैठका सुरू असून मतदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचा दावा करण्यात आला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार यश मिळवतील, असा विश्वास शशिकांत शिंदे आणि अभयसिंह जगताप यांनी व्यक्त केला.

तुकाराम मुंडे यांच्या धडक कारवायांचे वारे राज्यभर; मात्र वाईत अजूनही ‘सब कुछ ठीक है’चे चित्र?

Web Title: Support abhaysinh jagtap for the self respect of satarkars mahavikas aghadi appeals to voters

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 09:27 PM

Topics:  

  • MVA
  • Satara News
  • Satara Politics
  • Shashikant Shinde

संबंधित बातम्या

Satara News : ‘वाघ्या घेवड्याचा पीकविम्यात समावेश करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणार,’ जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आश्वासन
1

Satara News : ‘वाघ्या घेवड्याचा पीकविम्यात समावेश करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणार,’ जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आश्वासन

Shivendrasinhraje Bhosale: उंब्रज विश्रामगृह भूमिपूजनात शिवेंद्रसिंहराजेंची टोलेबाजी! कराड उत्तरच्या राजकारणावर सूचक भाष्य
2

Shivendrasinhraje Bhosale: उंब्रज विश्रामगृह भूमिपूजनात शिवेंद्रसिंहराजेंची टोलेबाजी! कराड उत्तरच्या राजकारणावर सूचक भाष्य

Satara News: ‘तपासणी करा, नाहीतर कायद्याच्या कचाट्यात’; ग्रामपंचायतींच्या कारभारावर जनहक्क समितीची नजर
3

Satara News: ‘तपासणी करा, नाहीतर कायद्याच्या कचाट्यात’; ग्रामपंचायतींच्या कारभारावर जनहक्क समितीची नजर

BJP Satara : साताऱ्यात २,०२५ दिव्यांच्या रोषणाईत भाजपच्या ‘Sewa Sankalp Abhiyan’चा प्रारंभ!
4

BJP Satara : साताऱ्यात २,०२५ दिव्यांच्या रोषणाईत भाजपच्या ‘Sewa Sankalp Abhiyan’चा प्रारंभ!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.