ऐन निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला निर्देश दिले आहेत.
विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबतचा विषय न्यायप्रविष्ट आहे. दरम्यान ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाने पुढील ३६ तासाच्या आत राज्यातील मराठी वर्तमानपत्रात मोठ्या जाहिराती देऊन हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असं नमूद करण्याचे निर्देश अजित पवार गटाला दिले आहेत. तसंच या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत घड्याळ चिन्ह आम्हाला दिलंय, असंही नमूद करण्याचे निर्देश न्यायालयाने म्हटलं आहे.
अजित पवार गटात फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबतचा खटला सध्या सुप्रीम कोर्टात सुरू आहे. सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक सुरू आहे. निवडणूक प्रचारातील जाहिराती आणि बॅनरमध्ये अनेक ठिकाणी डिस्क्लेमर दिला नसल्याचा दावा शरद पवार यांचे वकील प्रांजल अगरवाल यांनी कोर्टात केला होता. डिस्क्लेमर दिलेले नसल्याचे स्क्रीनशॉट देखील दाखवण्यात आले आहेत. यानंतर जाहिरात आणि बॅनरमध्ये प्रत्येक दिवशी येणाऱ्या जाहिरातीमध्ये हा डिस्क्लेमर देत आहात का ? असा सवाल न्यायालयाने अजित पवार गटाला केला. अजित पवार गटानेही आपण न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत असल्याचं सांगितलं.
न्यायालयाने शरद पवार गटाची बाजू ऐकून घेतल्यानंतर अजित पवार गटाला, पुढील ३६ तासाच्या आत राज्यातील सर्व मोठ्या मराठी वर्तमानपत्रात मोठ्या जाहिराती देऊन, हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असा मजकूर त्या जाहिरातीत नमूद करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत घड्याळ चिन्ह वापरण्याचे अधिकार तुम्हाला दिले आहेत, असंही नमूद करून तसं प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
यावेळी शरद पवार गटाच्या वकिलांनी नागालँड आमदार अपत्रता प्रकरणी देखील सोबत सुनावणी घेण्याची मागणी केली. यावर अजित पवार गटाने आक्षेप घेत शरद पवार गटाकडून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न जात असल्याचं सांगितलं. पुढच्या १० दिवसांवर निवडणूक आली आहे. आमच्या उमेदवारांनी घड्याळ चिन्हावर अर्ज दाखल केले आहेत, तसा प्रचार सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
गेल्या आठवण्यात शरद पवार यांनी अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली आणि तोच पक्ष माझ्याकडून हिसकावून घेतला नेला, अशी खंत पवारांनी बारामतीत बोलून दाखवली होती. कधीही कोर्टाची पायरी चढली नव्हती पण न्यायालयात जाण्याची आणली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष काढला, मात्र एके दिवशी काही लोकांनी हा पक्ष आता त्यांचा आहे, असं सांगितलं. हे दुसरे कोणी नव्हते, ते आमचेच लोक होते. मला समन्स बजावला,पक्ष पळवला, चिन्ह पळवल्याचा आरोप शरद पवारांनी या सभेत केला. चार वेळा बारामतीचा उपमुख्यमंत्री बनवला. मी विरोधी पक्षनेते म्हणून काम केले, तरीही लोकांची साथ सोडली नव्हती, असंही त्यांनी म्हटलं होतं.