सध्या देशभरात सगळीकडे निवडणुकीचे वातावरण आहे. त्यामुळे सर्वच पक्षांकडून निवडणुकीच्या प्रचाराची जोरदार तयारी चालू आहे. अश्यातच आज शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नरेंद्र मोदीवर टीका केली आहे. चंद्रपूरमध्ये काल नरेंद्र मोदींच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत नरेंद्र मोदी म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना, तर उद्धव ठाकरेंची शिवसेना ही नकली शिवसेना, असे म्हणत त्यांनी ठाकरे गटावर टीका केली होती. त्यांनी केलेल्या या टीकेला ठाकरे गटाकडून प्रतिउत्तर देण्यात आले आहे. जागावाटपासाठी भाजपचे नेते मातोश्रीच्या दारात उभे राहायचे. पण तेच नेते टेंभी नाक्यावर कधी गेल्याचे चित्र पाहायला मिळाले नाही, त्यामुळे खरी शिवसेना कुणाची? असे म्हणत सुषमा अंधारे यांनी नरेंद्र मोदींच्या टीकेला प्रतिउत्तर दिले आहे.
नरेंद्र मोदींच्या टीकेला प्रतिउत्तर देत सुषमा अंधारे म्हणाल्या, गोंदियाच्या सभेमध्ये बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले होते, शिवसेना शिंदेंची आहे तर खरे शिवसेनाप्रमुख असल्याची मुक्ताफळे नेहमीप्रमाणे उधळलेली. सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आठवण करून दिली पाहिजे, जेव्हा वंदनीय बाळासाहेब हयात होते तेव्हा जागावाटपाची चर्चा करण्यासाठी भाजपचे नेते मातोश्रीवर यायचे. तेव्हापासून उद्धव ठाकरे पाहत आहेत. जागावाटपाच्या चर्चेसाठी भाजपचे नेते मातोश्रीचे उंबरे झिजवायचे. बाळासाहेबांच्या काळात अडवाणी असतील किंवा अटलजी असतील, गडकरी असतील किंवा मुंडे साहेब असतील, तसेच उद्धव ठाकरेंच्या काळात मोदी असतील किंवा शाह असतील हे मुंबईत मातोश्रीवर यायचे. आम्हाला किती जागा देताय यासाठी अत्यंत याचिकाकासारखे मातोश्रीच्या दरामध्ये उभे राहायचे. त्यावेळी आम्ही याच अटीवरतुमच्यासोबत युती करणार होतो, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी भाजपवर टीका केली आहे.
पुढे बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, जेव्हापासून आमच्यातील एक गॅंग फितूर झाली आहे. त्या फितुराला एकदाही शक्य झाले नाही टेंभी नाक्यावर मोदी किंवा शहा यांना जागा वाटपासाठी बोलावले. उलट टेंभी नाक्यातील माणूस मुजरे करत दिल्लीला गेला. याच्यातूनच खरी शिवसेना कोणाची आहे हे स्पष्ट होतं, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.