दौंड तालुक्यातील ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या ५९ बेकायदा होर्डिंगवर दौंड पंचायत समितीने कारवाईचा बडगा उघडला आहे. संबंधित होर्डिंगधारक मालकांना नोटीस बनवण्यात आली आहे, ही माहिती दौंड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रशांत काळे यांनी दिली.
पाटस : दौंड तालुक्यातील ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या ५९ बेकायदा होर्डिंगवर दौंड पंचायत समितीने कारवाईचा बडगा उघडला आहे. संबंधित होर्डिंगधारक मालकांना नोटीस बनवण्यात आली आहे, ही माहिती दौंड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रशांत काळे यांनी दिली.
मुंबई येथे बेकायदा होर्डिंग पडल्याने जीवितहानीची दुर्घटना घडली होती. या घटनेनंतर राज्यातील प्रशासन खडबडून जाग झाले. पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जिल्ह्यातील तहसीलदार, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आपापल्या कार्यक्षेत्रातील जाहिरातीसाठी लावण्यात आलेल्या बेकायदा लोखंडी होर्डिंगवर तातडीने कारवाई करावी, असा आदेश नुकताच काढण्यात आला होता. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील अनेक भागात प्रशासनांने बेकायदा होर्डिंगवर कारवाई करण्यास सुरुवात केली.
दौंड तालुक्यात पुणे सोलापूर महामार्ग, पाटस-दौंड अष्टविनायक रस्ता, तसेच राज्य आणि जिल्हा मार्गालगत ठिकठिकाणी बेकायदा लोखंडी होल्डिंग उभारण्यात आल्याचे चित्र होते. जाहिरातीसाठी लावण्यात आलेले या लोखंडी होर्डिंग उभारणाऱ्या संबंधित मालकांनी कोणत्याही प्रशासनाची कायदेशीर परवानगी घेतली गेली नसल्याचे आता उघड आले आहे. रस्ता लगत आणि इमारतीवर अनेक ठिकाणी धोकादायक पद्धतीने आणि अपघाताला निमंत्रण देणारे होल्डिंग लावल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत. मागील कित्येक वर्षापासून हे लोखंडी होर्डिंग मालकांनी जाहिरातीवर लाखोंची कमाई केली.
होर्डिंग मालकांचे धाबे दणाणले
आता दौंड पंचायत समितीने कारवाई करण्यास सुरुवात केल्याने या होर्डिंग मालकांचे धाबे दणाणले आहेत. दौंड तालुक्यातील सहजपूर, बोरीपार्धी, बिरोबावाडी, सोनवडी, वाखारी, वासुंदे, देउळगावगाडा, भांडगाव, यवत, पाटस, बोरीभडक व कुरकुंभ या ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या सुमारे ५९ बेकायदा होर्डिंग मालकांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामध्ये फक्त पाटस ग्रामपंचायत हद्दी मध्येच २२ बेकायदा होर्डिंग धारक आहेत. नोटीस मिळाल्यापासून पंधरा दिवसांच्या आत संबंधित होर्डिंग मालकांनी खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दौंड तालुका ग्रामपंचायत हद्दीतील बेकायदा होर्डिंग मालकांवर पुणे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ठोस अशी कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे,अशी माहिती काळे यांनी दिली.
Web Title: Take action against unauthorized hoardings notice of action issued by daund panchayat samiti nrdm