अहमदनगर : एका नराधमानं शिक्षकी पेशाला काळीमा फासल्याचं कृत्य समोर आलं आहे. शाळेत (School) शिकणाऱ्या एका १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी (Girl) अभ्यासाच्या (Sutdy) नावाखाली या नराधमानं संवाद वाढवला. त्यानंतर हा शिक्षक तिच्याशी स्नॅपचॅटवर वरुन संवाद साधू लागला. त्या दोघांमध्ये मैत्रीचं नातं निर्माण होत असतानाच या शिक्षकानं या विद्यार्थिनीला तिच्या अर्धनग्न अवस्थेतील फोटो स्नॅपचॅटवर शेअर करण्यास सांगितले. ही अल्पवयीन मुलगीही या शिक्षकाला भुलली आणि तिनं हे कृत्य केलं. नंतर याच फोटोंच्या आधाराने या शिक्षकानं तिला ब्लॅकमेल केलं. या मुलीला घेऊन हा नराधम आष्टीच्या एका लॉजवर गेला आणि त्यानं या मुलीवर बलात्कार केला. आता या मुलीनं हा सगळा प्रकार उघड केल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
शिक्षक की राक्षस?
राधाकिसन मुकुमकर असं या शिक्षकाचं नाव आहे. या आरोपी शिक्षकाचं वय 30 वर्ष आहे. शिक्षक आणि विद्यार्थी या विश्वासाच्या नात्यालाच या राधाकिसनच्या निच कृत्यानं काळीमा फासला गेलाय. पोलिसांनी आता या नराधमाला अटक केली असून त्याला 26 जूनपर्यंत कोठडी देण्यात आलीय. या सगळ्या कृत्यामुळं या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालकही हादरले आहेत. असे शिक्षक शाळेत शिकवूच कसे शकतात, असा सवाल आता ते करतायेत. शाळेत जाणाऱ्या आमच्या मुली सुरक्षित आहेत का, असा प्रश्न त्यांना भेडसावतोय.
कसा उघडकीस आला प्रकार ?
सुरुवातीला या नराधम शिक्षकानं अभ्यासाच्या नावाखाली या 14 वर्षांच्या मुलीशी संवाद वाढवला. नंतर तो तिच्याशी स्नॅपचॅटवर संवाद साधत होता. संवादातून या शिक्षकानं 14 वर्षांच्या विद्यार्थिनीशी जवळीक निर्माण केली. त्यानंतर तिच्याकडे अर्धनग्न अवस्थेतील फोटोंची मागणीही केली. जानेवारी 2023 पासून हा सगळा प्रकार सुरु होता. नंतर तिला फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 24 जून रोजी हा नराधम तिला घेून लॉजवर गेला आणि त्यानं या असल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. कुणाला काही सांगितलं तर फोटो व्हायरल करण्याची धमकीही दिली. या मुलीनं पालकांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर या प्रकरणात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.