• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • अन्य Navbharat LIVE
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Terrible Accident In Karad 7 People Injured

कराडमध्ये भीषण अपघात; कारने सात वाहनांना उडवलं, सहाजण जखमी

कृष्णा कॅनॉलपासून रस्त्यात दिसेल त्या वाहनाला धडक देत कराड शहरात आलेल्या इको कारमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. बालाजी हॉस्पिटलसमोरील परिसरात इको कारसह तीन अपघातग्रस्त दुचाकी पडल्या होत्या.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 26, 2025 | 03:12 PM
कराडमध्ये एका कारने सात वाहनांना उडवले

कराडमध्ये एका कारने सात वाहनांना उडवले (Photo : Accident)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कराड : शहरानजीकच्या विद्यानगर, कृष्णा कॅनॉल बाजूकडून शहरात जाणाऱ्या इको कारने सुमारे 300 मीटर अंतरात सात वाहनांना उडविल्याची थरारक घटना घडली. यामध्ये इको कारसह चार दुचाकी, दोन रिक्षा व एका कारचे मोठे नुकसान झाले. तसेच अपघातात सहाजण जखमी झाले असून, त्यांच्यावर उपजिल्हा रूग्णालय व खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी अपघातप्रकरणी इको चालक संजय सर्जेराव पवार (वय ६३, रा. शिवाजी हौसिंग सोसायटी, कराड) यांना ताब्यात घेतले असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. याबाबत घटनास्थळ व पोलिसांनी मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास संजय पवार व त्यांच्या पत्नी सुषमा पवार त्यांच्या ईको कारने कृष्णा कॅनॉल बाजूकडून कराड शहरात येत होते. कॅनॉलच्या पुढच्या बाजूला ईको कारने प्रथम रिक्षाला धडक दिली. यानंतर एका दुचाकीला धडक दिली.

कृष्णा पुलावरून शहरात आल्यावर इको कारने बालाजी हॉस्पिटलजवळ एका कारला जोराची धडक दिली. या कारजवळ पार्क केलेल्या एका दुचाकीलाही धडक देऊन इको कारने बालाजी हॉस्पिटलसमोर उभा असलेल्या रिक्षा व दोन दुचाकींनाही धडक दिली. यामध्ये दुचाकीवर रिक्षा पलटी झाली. तसेच या रिक्षावर इको कारही पलटी झाली. कारच्या धडकेने बालाजी हॉस्पिटलजवळ असलेले एक झाड उन्मळून पडले आहे. यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी पलटी झालेली कार सरळ करून त्यातील महिला व नागरिकाला बाहेर काढून बालाजी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.

दरम्यान, कृष्णा कॅनॉलपासून रस्त्यात दिसेल त्या वाहनाला धडक देत कराड शहरात आलेल्या इको कारमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. बालाजी हॉस्पिटलसमोरील परिसरात इको कारसह तीन अपघातग्रस्त दुचाकी पडल्या होत्या. वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

अपघात विभागाचे पोलीस घटनस्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी प्रथम बघ्यांची गर्दी हटवून वाहतूक सुरळीत केली. तसेच सर्व अपघातग्रस्त वाहने कराड शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आली. या अपघातात संजय पवार, सुषमा पवार यांच्यासह रफिक मुजावर (वय ३४, रा. चौंडेश्वरीनगर), विशाल उथळे (वय २२), कल्याण बेडके (वय ३४, रा. सैदापूर), समीर चौधरी (वय २६, रा. सातारा), शिवानी भोसले (रा. खोडशी) आदी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपजिल्हा रूग्णालय व खाजगी रूग्णालयात उपचार करण्यात आले.

Web Title: Terrible accident in karad 7 people injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2025 | 03:12 PM

Topics:  

  • Accident Case
  • Karad news

संबंधित बातम्या

Maratha Reservation: “… आरक्षण शक्य नाही”; काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचे खळबळजनक विधान
1

Maratha Reservation: “… आरक्षण शक्य नाही”; काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचे खळबळजनक विधान

Nashik News : धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी
2

Nashik News : धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी

Pune News: कुंडेश्वर अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदत; अजित पवारांची घोषणा
3

Pune News: कुंडेश्वर अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदत; अजित पवारांची घोषणा

Jaykumar Gore News:  कराड तालुक्यातील विकासकामांना गती ; १५ कोटींचा निधी मंजूर
4

Jaykumar Gore News: कराड तालुक्यातील विकासकामांना गती ; १५ कोटींचा निधी मंजूर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
ज्योतिर्लिंग मंदिरातील चोरीचा तीन दिवसांत उलगडा; आरोपीला ठोकल्या बेड्या

ज्योतिर्लिंग मंदिरातील चोरीचा तीन दिवसांत उलगडा; आरोपीला ठोकल्या बेड्या

Nude Gang: ‘न्यूड गँग’ची दहशत, शेतातून खेचून महिलांना…ड्रोनद्वारे पोलीस घेताहेत शोध

Nude Gang: ‘न्यूड गँग’ची दहशत, शेतातून खेचून महिलांना…ड्रोनद्वारे पोलीस घेताहेत शोध

India US Trade Dispute: ‘भारत लवकरच आमच्याकडे माफी मागेल’, अमेरिकेच्या मंत्र्यांचे वादग्रस्त विधान

India US Trade Dispute: ‘भारत लवकरच आमच्याकडे माफी मागेल’, अमेरिकेच्या मंत्र्यांचे वादग्रस्त विधान

21 हजार पोलीस, 10 हजार CCTV आणि AI ची गर्दीवर करडी नजर, गणेश विसर्जनासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

21 हजार पोलीस, 10 हजार CCTV आणि AI ची गर्दीवर करडी नजर, गणेश विसर्जनासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Nissan ची Spinny सोबत पार्टनरशिप! यामुळे ग्राहकांना ‘हा’ फायदा होणार

Nissan ची Spinny सोबत पार्टनरशिप! यामुळे ग्राहकांना ‘हा’ फायदा होणार

Asia Cup 2025 साठी 8 संघ जाहीर! सर्वात मजबूत स्क्वॉड कोणता? पहा एका क्लिकवर

Asia Cup 2025 साठी 8 संघ जाहीर! सर्वात मजबूत स्क्वॉड कोणता? पहा एका क्लिकवर

मोठी बातमी! ‘रशियाकडून तेल खरेदी करणारच यात शंका नाही…’ ट्रम्प टॅरिफदरम्यान निर्मला सीतारमण यांचे मोठे विधान

मोठी बातमी! ‘रशियाकडून तेल खरेदी करणारच यात शंका नाही…’ ट्रम्प टॅरिफदरम्यान निर्मला सीतारमण यांचे मोठे विधान

व्हिडिओ

पुढे बघा
Thane : ठाण्यात जय भवानी मित्र मंडळाचा देशभक्तीचा देखावा

Thane : ठाण्यात जय भवानी मित्र मंडळाचा देशभक्तीचा देखावा

Solapur : छत्रपती संभाजी महाराज तलाव येथील विसर्जन कुंडांची केली पाहणी

Solapur : छत्रपती संभाजी महाराज तलाव येथील विसर्जन कुंडांची केली पाहणी

Chandrapur : चंद्रपूरमध्ये गणपती विसर्जन व ईद-ए-मिलादपूर्वी पोलिसांचा रूट मार्च ‪

Chandrapur : चंद्रपूरमध्ये गणपती विसर्जन व ईद-ए-मिलादपूर्वी पोलिसांचा रूट मार्च ‪

धुळे पोलिसांची गुजरातमध्ये धडक कारवाई; अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची सुटका

धुळे पोलिसांची गुजरातमध्ये धडक कारवाई; अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची सुटका

Ahilyanagar : शिवगर्जनाच्या मंडळाने जागवला देशाभिमान; देखाव्यांना नागरिकांची मोठी पसंती

Ahilyanagar : शिवगर्जनाच्या मंडळाने जागवला देशाभिमान; देखाव्यांना नागरिकांची मोठी पसंती

Ambernath : अंबरनाथच्या मेट्रो स्थानकांना कानसई गाव आणि श्री क्षेत्र शिवमंदिर नाव द्या! स्थानिकांची मागणी

Ambernath : अंबरनाथच्या मेट्रो स्थानकांना कानसई गाव आणि श्री क्षेत्र शिवमंदिर नाव द्या! स्थानिकांची मागणी

Nashik: नाशिकचा अभिमान! १०७ वर्षांची परंपरा जपणारे रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ

Nashik: नाशिकचा अभिमान! १०७ वर्षांची परंपरा जपणारे रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.