हिंदी सक्तीकरणाचा निर्णय़ रद्द केल्यानंतरही ठाकरे बंधुंची विजयी रॅली होणारच
Raj Thackeray’s Victory Rally Announcement: राज्य सरकारने हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयावरून उद्भवलेल्या वादानंतर रविवारी संबंधित दोन्ही शासकीय निर्णय (जीआर) रद्द केल्याची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ५ जुलैला होणारा मोर्चा रद्द करण्यात आल्याची माहिती दिली आहे. सरकारच्या हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात मनसेने आक्रमक भूमिक घेतली होती. तसेच आंदोलनाची घोषणाही केली होती. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचेही आंदोलन होणार होते. पण राज्य सरकारने निर्णय रद्द केल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी मोर्चा रद्द झाल्याची माहिती दिली. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का,याचया चर्चाही राज्यात सुरू झाल्या होत्या.
या सर्व चर्चांवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “मी कोणाच्याही विरोधात नव्हतो, पण महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घालता जात असेल तर त्याविरोधात आवाज उठवण माझं कर्तव्य आहे. या आंदोलनामागे कोणताही राजकीय हेतू नव्हता. सरकारने निर्णय रद्द केला असला तरू त्यावर अद्याप लेखी आदेश काढण्यात आलेला नाही. याकडेही राज ठाकरे यांनी लक्ष वेधलं. त्यामुळे हा मुद्दा अजून बराच काळ चर्चेत राहणार आहे.
IAS Rajeshkumar Meena: IAS राजेशकुमार मीना यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती
राज ठाकरे म्हणाले की, राज्य सरकारने जीआर रद्द केल्यानंतर मला संजय राऊतांच फोन आला होता. पाच तारखेचा मोर्चा रद्द करावा लागेल, असं त्यांनी सांगितलं. त्यावर, पण आपण ५ तारखेला विजयी मोर्चा घेऊयात, पण ठिकाण ठरवू नका, असे मी त्यांना सांगितलं आहे. त्याप्रमाणे अजून विजयी मोर्च्याचे ठिकाण काही ठरलेले नाही. मी सहकाऱ्यांशी बोलून ठरवेल असेही त्यांनी स्पष्ट केलं. संजय राऊत यांच्या फोननंतर विजयी मेळावा होमार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. विशेष म्हणजे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील रविवारीच विजयी सभेचे संकेत दिले होते. त्यामुळे जीआर रद्द झाले तरी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचेही निश्चित झाले आहे.
राज ठाकरे म्हणाले की, हा विजय मराठी माणसांचा आहे. पण आता युती, आघाडीचा विचार करू नका, याकडे एक संकट म्हणून पाहायला पाहिजे. राज्य सरकारने काल हिंदी भाषा सक्तीचे जीआर रद्द केले. ते त्यांना रद्द करण्यासाठी भाग पाडले गेले. त्यासाठी चारही बाजूंनी त्यांच्यावर दबाव आल्याने सर्व मराठी बांधवांचे मी अभिनंदन करतो. असे ठाकरे म्हणाले.
सरकारी नोकरी: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 2964 पदांवर भरती; अर्ज करण्याची शेवटची तारीख आज
उद्धव ठाकरे यांनी 5 जुलैचा मोर्चा रद्द झाला असला तरी जल्लोष केला जाणार सभा किंवा मेळावा घेतला जाणार त्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं अस आवाहन केलं आहे. या जल्लोषासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. मुंबईतील मराठी शक्तीची एकजुट दाकवून देऊ या उद्धव ठाकरेंच्या आवाहनाला मनसेकडून कसा प्रतिसाद द्यायचा याबाबतची रणनीती आज होत असलेल्या मनसेच्या बैठकीमध्ये ठरवली जाणार आहे. हिंदी सक्तीचा निर्णय रद्द झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज महत्त्वाची बैठक बोलावली आहे. मनसेचे नेते, सरचिटणीस आणि प्रमुख पदाधिकारी राहणाऱ बैठकीसाठी उपस्थित आहेत. बाळा नांदगांवकर, अविनाश जाधव, संदीप देशपांडे आणि अविनाश अभ्यंकर यासारखे मनसेचे नेते बैठकीला हजर आहेत.
राज्यात पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याचा सरकारचा निर्णय अखेर मराठी जनतेच्या दबावापुढे झुकत रद्द करण्यात आला. यावर प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले, “राज्यात पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. पण त्याविरोधात मराठी माणूस एकजुटीने उभा राहिला. शिवसैनिकांसह इतर पक्ष व संस्थांनी याला तीव्र विरोध करत जीआरची होळी केली. मराठी माणसाच्या दबावामुळे सरकारला हा निर्णय मागे घ्यावा लागला. मराठी माणसाच्या शक्तीपुढे सरकारची सक्ती हरली.”
५ जुलै रोजी मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्या संयुक्त मोर्चाची घोषणा आधी करण्यात आली होती. मात्र, सरकारने हिंदी सक्तीचा जीआर रद्द केल्यानंतर हा मोर्चा रद्द करण्यात आला आहे. तरीही ५ जुलै रोजी ‘विजयी जल्लोष कार्यक्रम’ होणारच, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. “मोर्चा निघणार नसला तरी, ५ तारखेला सभेच्या स्वरूपात किंवा दुसऱ्या पद्धतीने कार्यक्रम आयोजित करण्यात येईल. या संदर्भात मनसेसह इतर पक्ष आणि मराठीसाठी लढणाऱ्या संस्थांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल.” या पार्श्वभूमीवर मराठी अस्मितेच्या लढ्याला मिळालेलं जनसमर्थन आणि सरकारची माघार हे दोन्हीच आगामी काळात राजकीय चर्चेचं केंद्रबिंदू ठरणार, हे निश्चित आहे.