Photo Credit- Team Navrashtra संजय राऊत उद्धव ठाकरे यांच्यासोबत खूश नाहीत असा दावा शिंदे गटाच्या खासदाराने केला आहे
मुंबई: शिवसेनेत फुट पडून आज तीन वर्ष उलटली तरी ठाकरे गट आणि शिंदे गटातील धुसफूस अद्यापही कायम आहे. दिवसेंदिवस हा संघर्ष वाढतच चालला आहे, हे सर्व सुरू असताना आता ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी संजय राऊत यांनी आपल्याला फोन केल्याचा दावा केलाआहे. संजय राऊत ठाकरे गटात खूश नाही. आपण नाईलाजाने उद्धव ठाकरेंसोबत राहतोय, एकनाथला सांगा माझ्याबद्दल मनात काही काळं ठेवू नका, असाही दावा म्हस्के यांनी केला आहे.
त्याचं झालं की, उद्धव ठाकरेंनीच एकनाथ शिंदेंना सर्वात जास्त ताकद दिली. पण त्यांना अशी ताकद देऊ नका, हा माणूस घात करेल, असं सांगणारी माणसेच आज त्यांच्यासोबत ठाण्यात वावरत आहेत. आता ठाण्यात राहणाऱ्या अनेक आमदार खासादारच उद्धव ठाकरेंना म्हणाले होते की, साहेब हा माणूस चांगला नाही त्याची नियत चांगली नाही, तो कधीही तुम्हाला धोका देईल,असं खासदार संजय राऊत म्हणाले होते. संजय राऊतांच्या या वक्तव्यानंतर खासदार नरेश म्हस्के यांनी पलटवार केला आहे.
Yashwant Verma News: न्या. यशवंत वर्मा प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी
एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर संजय राऊत रोज मला फोन करत होते. एकनाथला सांग, मला नाईलाजाने यांच्यासोबत राहावे लागत आहे. पण, माझ्याबद्दल मनात काही काळं ठेवू नको, हे संजय राऊत मला स्वत: फोन करुन सांगत होत. पण आता ते हे विसरले? असा दावा नरेश म्हस्के यांनी केला आहे. तसेच, ही बंद मूठ उघडली तर तुम्हालाच भारी पडेल, असा इशाराही त्यांनी संजय राऊतांना दिला आहे.
नरेश म्हस्के पुढे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतली, त्याच दिवशी उद्धव ठाकरेंनी मला फोन करून बोलवले होते. पण आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहोत. आम्ही भेटायला येणार नाही.असं आम्ही सांगितलं होतं. एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली भूमिका आम्हाला मान्य आहे, आणि आम्ही त्याच्यासोबत आहोत. आम्ही भेटायला येणार नाही.
NATIONAL WEED APPRECIATION DAY : ‘राष्ट्रीय तण कौतुक दिन’ म्हणजे निसर्गाचा अद्भुत वारसा जतन
यांनी बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या शेवटच्या दिवसात किती त्रास दिला हे सगळ्यांना माहिती आहे. राज ठाकरे त्याबाबत अनेकदा बोलले आहेत. औरंगजेबाने सत्तेसाठी स्वत:च्याच भावांचा काटा काढला. उद्धव ठाकरेंनी वेगळं काय केलं? त्यांनी तर आपल्या सख्ख्या भावांनाही त्यांनी पद्धतशीरपणे दूर केलं. ठाकरेंनी बाळासाहेबांची वैचारीक संपत्ती त्यांनी सोडली. पण इतर संपत्तीसाठी भावाविरोधात दावा दाखल केल.. बाळासाहेबांना अखेरच्या दिवसांत त्यांनी त्रास दिलाच पण त्यांच्या निधनानंतर शिवसेनेच्या दुष्मनांशी हातमिळवणी केली आणि आजही ते शिवसैनिकांना यातना देत आहेत. अशा शब्दांत नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला.