ठाकरेंच्या पराभवावर फडणवीसांचे भाष्य (फोटो -ani)
Devendra Fadnavis: मुंबईतील प्रतिष्ठित बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी निवडणूक २०२५ मध्ये ठाकरे बंधूंना दारुण पराभव स्वीकारावा लागला आहे. ही निवडणूक ठाकरे बंधूंसाठी महत्वाची समजली जात होती. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा सुरू होती. मात्र लिटमस टेस्ट म्हणून पहिल्या जाणाऱ्या निवडणुकीत त्यांच्या पॅनलचा दारुण पराभव झाला आहे. आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबईतील बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी निवडणूक प्रतिष्ठेची करणाऱ्या ठाकरे बंधू यांचा दारुण पराभव झाला आहे. त्यांनी उभे केलेल्या पॅनलचा एकही उमेदवार निवडून आला नाही. यानंतर राज्यात एकच चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान या निवडणुकीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
मला आस वाटत की अशा प्रकारच्या निवडणुकांच राजकीयीकरण करण्यात येऊ नये. ही पतपेढीची निवडणूक होती. त्यांनीच त्याच राजकीयीकरण केले. शशांक राव आणि प्रसाद लाड आमचेच आहेत. आम्ही त्याच कोणतेही राजकीयीकरण केले नाही.
🕔 4.45pm | 20-8-2025📍Pune.
LIVE | Media Interaction#Maharashtra #Pune https://t.co/MA2cT4KzAd
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 20, 2025
त्यांनी मात्र आता दोन ठाकरे बंधू एकत्र, आता ब्रॅंड ठाकरे निवडून येणार. अशा प्रकारचे त्यांनी राजकीयीकरण केले. पण ते लोकांना आवडलेले दिसत नाहीये. त्याच्यामुळे त्यांना त्या ठिकाणी एकही जागा मिळालेली नाही. या ठिकाणी तरी त्यांना नाकारण्यात आलेले आहे, असे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
प्रसाद लाड यांनी डिवचले
ठाकरे बंधू मराठी भाषेशी संबंधित निर्माण झालेल्या वादावर ठाकरे बंधू अनेक वर्षांनी एकत्रित आल्याचे पाहायला मिळाले. बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी निवडणूक ही ठाकरे बंधूंसाठी लिटमस टेस्ट असल्याचे म्हटले जात होते. मात्र पहिल्याच परीक्षेत ठाकरे बंधूंचा दारुण पराभव झाला आहे. त्यांच्याविरोधात प्रसाद लाड व शशांक राव यांचे पॅनल विजयी झाले आहे. विजय होताच भाजप नेते प्रसाद लाड यांनी ठाकरे बंधूंना डिवचले आहे.
दरम्यान मराठी भाषेवर जो वाद निर्माण झाला होता, त्यानंतर राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे जवळपास 18 ते 19 वर्षांनी एकत्रित आल्याचे पाहयला मिळाले. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून दोन्ही नेत्यांनी लवकरच होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एकत्र यावे अशी मागणी केली जात होती. दरम्यान ‘बेस्ट’ निवडणुकीत दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे पॅनल उभे केले होते. मात्र त्यांचा या निवडणुकीत सपशेल पराभव झाला आहे. त्यामुळे आगामी काळात हे दोन्ही बंधु एकत्रित येणार का हे पहावे लागणार आहे.