Dombivali: गॅसपुरवठा सुरु केला नाही तर आंदोलन करु; शिवसेना ठाकरे गटाचा इशारा
डोंबिवली– डोंबिवली पश्चिम भागात महानगर गॅसच्या वतीने गॅस पुरवठा सुरू करण्यास प्रचंड विलंब होत आहे. इमारतींमध्ये गॅस डिस्ट्रीब्यूशन लाईन टाकून दीड वर्षाचा कालावधी लोटला आहे. मात्र अद्याप गॅस पुरवठा सुरु करण्यात आलेला नाही, असा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतही एलपीजी सिलेंडरपेक्षाही गॅस पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला जास्त प्राधान्य देण्यात येत आहे. मात्र गेले दीड ते दोन वर्ष या सोसायटीतीला नागरिकांच्या घरात गॅस पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन टाकून झाल्या तरी याचा पुरवठा करण्यात आलेला नाही. ही बाब लक्षात घेत आता या नागरिकांसाठी शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
सदर बाब लक्षात घेत शिवसेना ठाकरे गटाच्या कार्य़कर्त्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख म्हात्रे यांनी सांगितले की, 2015-16 या वर्षात कल्याण डोंंबिवली महापालिकेत स्थायी समिती सभापती असताना डोंबिवलीतील काँक्रीट रस्त्यांचे काम दीनदयाल रोड व महात्मा गांधी रोड सुरू होते. त्यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी महानगर गॅसची डिस्ट्रीब्यूशन लाईन टाकण्याचे नियोजन केले होते.
याठिकाणी गॅसची डिस्ट्रीब्यूशन लाईन टाकण्यात आली आहे. लाईन टाकून झाली असली तरी या लाईन द्वारे नागरीकांना गॅसची होत नाही. मग लाईन टाकून काय उपयोग असा सवाल म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे. गॅस पुरवठा लाईनद्वारे होत नसल्याने नागरीकांमध्ये तीव्र नाराजी आहे. डोंबिवलीत कुठे कुठे ही लाईन टाकण्यात आली आहे. त्याची पाहणी शिसेना ठाकरे गटाच्या वतीने यावेळी जिल्हा प्रमुख म्हात्रे यांच्यासह डोंबिवली पश्चिमचे शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. महानगर गॅसने तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा शिवसेना ठाकरे गटाकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे यांनी दिला आहे.