पुछता है डोंबिवलीकर! रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामावर मनसे आमदाराचा संतप्त सवाल
डोंबिवली जिमखाना परिसरात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) लाखोंचा निधी खर्च करत काँक्रीटचा रस्ता तयार करण्यात आला. मात्र महिना भरतच या रस्त्याला तडे गेल्याने पुन्हा या रस्त्याची दुरुस्ती हाती घेण्यात आली. त्यामुळे या रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे . याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विट करत एम एम आर डी ए च्या अधिकाऱ्यांना लक्षात करत कारवाईची मागणी केली. अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांच्या पैशांचा चुराडा होतोय? पुछता है डोंबिवलीकर ! कारवाई कोणावर होणार? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह खासदार श्रीकांत शिंदे यांना ट्विट करत मनसे आमदार राजू पाटील यांनी संतप्त सवाल उपस्थित केला आहे.
कल्याण डोंबिवलीमधील डांबरी रस्ते सिमेंटचे करण्याकरीता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएच्या माध्यमातून जवळपास ४७० कोटीचा निधी मंजूर केला होता. या मंजूर निधीतून एमएमआरडीएने निविदा काढून ही कामे कंत्राटदाराच्या माध्यमातून कामाला सुरुवात झाली. ठिकठिकाणी सिमेंट रस्त्याची कामे सुरु करण्यात आली आहेत. डोंबिवली जीमखानासमोरचा रस्ता हा सिमेंटचा तयार करण्यात आला. सिमेंटचा रस्ता तयार झाल्यावर त्याच रस्त्याला तडे गेले आहे. या रस्त्याच्या तडे गेल्याने या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या प्रकरणी नागरीकांनी तक्रारी केल्या. रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याने हा रस्ता पुन्हा खोदण्यात आला. त्या रस्त्याचे काम पुन्हा नव्याने करण्यात येत आहे. हे काम पुन्हा केले जात असले तरी त्या कामातही वापरले जाणारे साहित्य सामग्री ही निकृष्ट दर्जाची आहे याकडेही पुन्हा नागरीकांनी लक्ष वेधले आहे.
पूछता है डोंबिवलीकर !
डोंबिवली मधील रस्त्यांच्या कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. रस्त्यांची काम करून पुन्हा निकृष्ट दर्जाचा ठपका ठेवत रस्त्यांचे खोदकाम सुरू आहे. नुकताच एमएमआरडीए च्या माध्यमातून डोंबिवलीच्या जिमखाना परिसरात रस्त्याचं काँक्रीट करण्याचं काम… pic.twitter.com/GEi0702qKp— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) July 2, 2024
डोंबिवली मधील रस्त्यांच्या कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. रस्त्यांची काम करून पुन्हा निकृष्ट दर्जाचा ठपका ठेवत रस्त्यांचे खोदकाम सुरू आहे. नुकताच एमएमआरडीए च्या माध्यमातून डोंबिवलीच्या जिमखाना परिसरात रस्त्याचं काँक्रीट करण्याचं काम करण्यात आलं होतं. मात्र आता निकृष्ट दर्जाचा ठपका ठेवून पुन्हा काँक्रीटचा रस्ता खोदण्याचे काम सुरू आहे. डोंबिवलीकरांसाठी मंजूर असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या निधीचा बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे चुराडा होत असल्याने या बेजबाबदार पणाला जबाबदार कोण ? हे तर डोंबिवली कर विचारणार ना ? पुछता है डोंबिवलीकर! कारवाई कोणावर होणार?