कल्याणमधील फोर्टिस हॉस्पिटल तसेच रोटरी क्लब ऑफ डोंबिवली आणि समन्वय सीनियर सिटीझन्स असोसिएशनसोबत सहयोगाने वृद्धांसाठी हृदय व हाडांच्या आरोग्यावर केंद्रित आरोग्य जनजागृती शिबिराचे आयोजन केले. रोटरी क्लब, डोंबिवली येथे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामध्ये २०० हून अधिक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. फोर्टिस हॉस्पिटल कल्याणमधील कन्सल्टण्ट-इंटरव्हेंशनल कार्डियोलॉजी डॉ. विवेक महाजन आणि कन्सल्टण्ट-ऑर्थोपेडिक्स डॉ. स्वप्नील केणी यांनी या शिबिराचे नेतृत्व केले, तसेच हृदयाचे आरोग्य व हाडांचे आरोग्य जतन करण्याबाबत आणि प्रतिबंधात्मक दृष्टिकोनासह लवकर लक्षणे ओळखण्याबाबत माहिती सांगितली.
हृदयरोग तज्ञांच्या महत्वाच्या टिप्स
डॉ. केणी यांनी आरोग्यदायी स्थितीत हाडांची घनता कायम राखण्यामध्ये संतुलित आहार व नियमित व्यायामाचे महत्त्व यावर भर दिला, ज्यामुळे संधिवात आणि फ्रॅक्चर्सची शक्यता कमी होऊ शकते. डॉ. महाजन यांनी वृद्धांना सामना करावा लागणऱ्या हृदयाच्या आरोग्यसंबंधित समस्या, लवकर चेतावणी चिन्हे जसे श्वास घेण्यास त्रास होणे किंवा छातीत दुखणे आणि कार्डियोव्हॅस्कुलर सिस्टम तंदुरूस्त ठेवण्यासाठी जीवनशैली बदल यावर प्रकाश टाकला. उपस्थित सहभागींनी परस्परसंवाद साधला, शेअर करण्यात आलेल्या व्यावहारिक टिप्सचे कौतुक केले आणि तज्ञांसोबत माहितीपूर्ण प्रश्नोत्तरे सत्रामध्ये सहभाग घेतला.
आम्ही वृद्ध लोकांच्या स्वास्थ्याप्रती कटिबद्ध
या उपक्रमाबाबत मत व्यक्त करत फोर्टिस हॉस्पिटल कल्याणचे फॅसिलिटी डायरेक्टर श्री. मोहित वानखेडे म्हणाले, ”फोर्टिस हॉस्पिटल कल्याणमध्ये आम्ही वृद्ध लोकांच्या स्वास्थ्याप्रती कटिबद्ध आहोत. हे शिबिर आरोग्य व स्वास्थ्याबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या आमच्या सुरू असलेल्या प्रयत्नांचा भाग आहे. संसाधने व माहिती देत आम्ही वृद्ध नागरिकांना लवकर निदान व वेळेवर हस्तक्षेपाच्या माध्यमातून त्यांच्या आरोग्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो, तसेच त्यांना आरोग्यदायी जीवन जगण्यास मदत करतो.”
हॉस्पिटलला अशा प्रकारचे उपक्रम सुरू ठेवण्याचा मनसुबा आहे, जे समुदायाला अधिक आरोग्यदायी व अधिक जागरूक करतील.
आत्पकालीन परिस्थितीमध्ये रुग्णांना तात्काळ वैद्यकीय सेवा मिळविणे अधिक सोपे जावे याकरिता फोर्टिस हॉस्पिटलने 24/7 आतत्कालीन हेल्पलाइन सुरु केली आहे. 022-4111 4111 या क्रमांकावर कॉल करून नागरिकांना मुंबई आणि परिसरातील जवळ असलेल्या फोर्टीस हॉस्पिटलशी संपर्क साधू शकतात. संपर्क साधल्यानंतर रुग्णांना फोर्टिसच्या लेव्हल १ ट्रॉमा सेंटर्सची सेवा वेगाने उपलब्ध केली जाणार आहे. #FirstCallFortis मोहिमेमुळे एक आपात्कालिन सज्ज हेल्थकेअर नेटवर्क उभे करण्याचे फोर्टीसचे लक्ष्य आहे. पुढील वर्षातील आरोग्य दिनी म्हणजे; 7 एप्रिल 2025 पर्यंत First Call Fortis मोहिमेची जनजागृती करुन 10 लाखांहून अधिक घरांपर्यंत आपली माहिती पोहोचवण्याचे लक्ष्यही रुग्णालयाने समोर ठेवले आहे.