The Advertisement Of 22 Thousand Seats Will Be Released Today On The Pavitra Portal Nrka
शिक्षक भरतीची प्रतीक्षा आता संपली; पवित्र पोर्टलवर 22 हजार जागांची जाहिरात आज प्रसिद्ध होणार
राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे राबविल्या जाणाऱ्या शिक्षक भरती प्रक्रियेला अखेर मुहूर्त सापडला आहे. सोमवारी दुपारनंतर शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या उमेदवारांना २१ हजार ९७८ जागांच्या जाहिराती पाहण्यास उपलब्ध होणार आहेत, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
मुंबई : राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे राबविल्या जाणाऱ्या शिक्षक भरती प्रक्रियेला अखेर मुहूर्त सापडला आहे. सोमवारी दुपारनंतर शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या उमेदवारांना २१ हजार ९७८ जागांच्या जाहिराती पाहण्यास उपलब्ध होणार आहेत, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. शालेय शिक्षण विभागातर्फे राबविल्या जाणाऱ्या शिक्षक भरती प्रक्रियेस खूप विलंब झाला आहे.
शिक्षकांची आंतरजिल्हा बदली, मराठी इंग्रजी माध्यम वाद, केंद्र शाळेवर नियुक्ती आदी कारणांमुळे भरती प्रक्रिया लांबली होती. अखेर राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या व सुमारे १ हजार खाजगी शिक्षण संस्थांमधील २१ हजार ९७८ जागांसाठीच्या जाहिराती सोमवारी प्रसिद्ध होणार आहेत. सध्या जिल्हा परिषदेच्या ७० टक्के जागांची भरती प्रक्रिया राबवली जात आहे. रयत शिक्षण संस्थेच्या सुमारे ८०० जागा या भरती प्रक्रियेत वाढल्या आहेत.
कोल्हापूर येथील स्वामी विवेकानंद संस्थेच्या जागा पुढील टप्यात समाविष्ट केल्या जाणार आहेत. त्यामुळे केवळ जिल्हा परिषदेच्याच नाही तर खासगी शिक्षण संस्थेच्या जागांवर सुद्धा पात्र उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. तब्बल १६ हजार ५०० जागांवर मुलाखती न घेता नियुक्ती केल्या जाणार आहेत.
Web Title: The advertisement of 22 thousand seats will be released today on the pavitra portal nrka