नागपूर : केंद्र सरकारने खासगीकरण मान्य केलेलं नाही. महावितरणला होत असलेल्या नुकसानाबाबत काय मार्ग काढला पाहिजे याचे मत मागविले होते. कर्मचाऱ्यांचे हित, कंत्राटी कामगारांचे हित जोपासण्याचा हा प्रयत्न आहे. उलट महाविकास आघाडी सरकारचा महावितरणचे खासगीकरण करण्याचा घाट होता. ते त्यासाठीच प्रयत्न करीत आहेत. तर, त्यांना १६ खासगी कंपन्यांना हे काम द्यायचे होते. पण, हा मुद्दा अंगाशी आल्याने केंद्र सरकारच्या बदनामीचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.