मुंबई : एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) आणि आमदारांच्या बंडखोरीने (Rebellion) राज्यात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा (Chief Minister Resign) दिला. आज एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार मुंबईत परतण्याची शक्यता आहे. शिंदे गट काल रात्री गोव्यातील ताज कन्व्हेंन्शन सेन्टर या हॉटेलमध्ये मुक्कामी होते. गोव्यातून (Goa) हे बंडखोर आमदार मुंबईत (Mumbai) परतण्याची शक्यता आहे. बंडखोरांच्या स्वागतासाठी भाजपने (BJP) जय्यत तयारी केली आहे. दुसरीकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सीआरपीएफचे (CRPF) दोन हजार जवान मुंबईत दाखल झाले आहेत.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्याने राज्यातील सत्तासंघर्षाची सुरुवात झाली होती. काही आमदारांसह एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाले आणि शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला. एकापाठोपाठ एक आमदार आणि मंत्री एकथान शिंदेंच्या गटात सामील झाले. अखेर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा त्याग केला आणि गेल्या अडीच वर्षांपासून महाविकास आघाडी सरकार कोसळले.
दहा दिवसांच्या नाट्यमय घडामोडींनंतर आज शिवसेनेचे बंडखोर आमदार मुंबईला परतणार आहेत. त्यासाठी केंद्र सरकारने संरक्षण पुरवले असून भाजप नेतेही स्वागतासाठी सज्ज आहेत. मात्र, त्यानंतर काय होणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.