सध्या राज्यातील वातावरणात चांगलीच उष्णता जाणवत आहे. उन्हाळा वाढल्यानंतर सगळीकडे लिंबूला मोठी मागणी असते. या दिवसांमध्ये लिंबाचे सरबत, ऊसाचा रस यांसारखे थंड पेय पिले जातात.त्यामुळे बाजारात लिंबाना मोठी मागणी आहे. मागणी वाढल्याने लिंबाच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. घाऊक बाजारात दर वाढले आहेत. घाऊक बाजारामध्ये १ किलो लिंबुसाठी १५० ते १७० रुपये किंमत मोजावी लागत आहे तर किरकोळ बाजारात एका लिंबाचा दर १० ते १५ रुपये आहे. भारतामध्ये सर्वाधिक लिंबू पिकवले जातात.
उन्हाळा वाढल्यानंतर लिंबाच्या मागणीमध्ये वाढ होते. एप्रिल मे महिन्यात हे दर आणखीन वाढत जातात. त्यामुळे जूनपर्यंत लिंबूचे दर वाढलेले राहणार आहेत, असे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. वाढत्या किंमतीमुळे लिंबू खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना १ किंवा २ लिंबू घ्यावे लागत आहेत. लिंबूला सर्वच दिवसांमध्ये मोठी मागणी असते. लिंबूचे अनेक आरोग्यदायी गुणकारी फायदे आहेत. मात्र लिंबूला उन्हाळ्यात सगळ्यात जास्त मागणी असते.
तापमानात वाढ झाल्याने थंड काहीतरी पिण्याची सगळ्याचं इच्छा होते. अश्यावेळी प्रत्येक घरामध्ये लिंबू सरबत बनवले जाते. त्यामुळे लिंबूला मोठी मागणी आहे. मार्च महिना सुरु झाल्यानंतर लिंबूचे दर सतत वाढत आहेत. मार्चमध्ये एक शेकडा लिंबू १२५ ते १५० रुपयांदरम्यान मिळत होते. तर आता त्यात वाढ झाली आहे. थंडीच्या दिवसांमध्ये लिंबूला थोडी कमी मागणी असते. पण उन्हाळा सुरु झाल्यानंतर लिंबूच्या दरात वाढ होते.
बाजारामध्ये लिंबूच्या आकारानुसार त्याचे दर ठरवले जातात. सगळ्यात लहान आकाराच्या लिंबूला १० रुपये दर मिळतो तर आकाराने मोठ्या असलेल्या लिंबूला १५ रुपये एवढा दर मिळतो. काही ठिकाणी लिंबू आकाराने लहान असले तर १० रुपयांना ३ लिंबू असे विकले जातात. उन्हाळा संपेपर्यंत लिंबूला बाजारात मोठी मागणी असल्याने लिंबूच्या भावामध्ये सतत चढ उतार होत आहे. बदलत्या हवामानाचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. तापमानात बदल झाल्यानंतर फळबागा, भाजीपाला यांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे बाजारात कमी प्रमाणात लिंबूची अवाक झाल्याने भाव वाढले आहेत.