संग्रहित फोटो
नवी मुंबईमध्ये अल्पसंख्याक विश्वास मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांनी स्पष्ट भाषेत वक्तव्य केले होते की अजित पवार नेहमी घातच करतात ह्या वक्तव्यावर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना उत्तर दिले आहे. अजित पवार म्हणाले की, नवीन जनरेशन आहे काही बोलली असली तरी त्याला उत्तर देण्याचे काही कारण नाही, तसेच सध्या अनेक तरुण नवीन राजकारणात आलेले आहेत. त्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस हर्षवर्धन पाटील चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सोबत चर्चा करू तसेच बारामतीमध्ये पाटील पवार कलगीतुरा पाहायला मिळणार असल्याचे विचारताच अजित पवार म्हणाले की, मला असं वाटत नाही असे वक्तव्य करणं टाळले.
महाराष्ट्र सर्वधर्म समभाव पाळणारं राज्य आहे. अल्पसंख्याक समाजाने कायम विश्वास दाखवला आहे. मुस्लिम समाजामध्ये भय दाखवून समाजाला अस्वस्थ करू पाहत आहेत. मात्र प्रदेशातील सर्व नागरिकांची जबाबदारी आमची आहे. राज्यात कायद्याचं राज्य असेल आणि कोणावर अन्याय होणार नाही असं अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विभागाच्या वतीने वाशी इथल्या सिडको प्रदर्शनी केंद्रात राज्यस्तरीय अल्पसंख्याक मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. आजच्या अल्पसंख्याक मेळाव्यात मंजूर झालेल्या ठरावावर बारकाईने लक्ष देणार असल्याचं आश्वासन ही अजित पवार यांनी दिलं. आमच्या पक्षात जास्तीत जास्त जिल्हात अध्यक्ष अल्पसंख्याक समाजातील आहेत. हा महत्वाचा विभाग आहे. त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे. या समाजातील मुलींना शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. वफ्फ बोर्डाच्या अडचणी सोडविण्यासाठी सूचना दिल्या आहेत. मागील वर्षी ५०० करोड दिले आहेत. या वर्षी जास्तीत जास्त मदत देण्यात प्रयत्न केला जाणार आहे. उर्दू हाऊस देण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही उपमुख्यमंत्री पवार यावेळी म्हणाले.
जे बोलतो ते करतो. सर्वांना सोबत घेऊन चाललो आहोत. राज्यात कायद्याचं राज्य असेल आणि कोणावर अन्याय होणार नाही असंही अजित पवार यावेळी म्हणाले. ८ लाख रुपयांचे उत्पन्न असलेल्या मुलींच्या शिक्षणाचा खर्च राज्य सरकार करणार आहे. या योजनेमध्ये अल्पसंख्याक समाजातील मुलींचाही समावेश असणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले.