PutinXiHotMic : माणूस अमर होणार? पुतिन-जिनपिंग मानवाला १५० वर्षे जिवंत ठेवणार, जाणून घ्या कसे ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Putin Xi hot mic immortality 150 years : बीजिंगमधील विजय परेड नेहमीच लष्करी ताकद आणि तंत्रज्ञानाचे प्रदर्शन असते, पण यंदाच्या परेडमध्ये काहीतरी वेगळे घडले. ३ सप्टेंबर २०२५ रोजी दुसऱ्या महायुद्धाच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त चीनमध्ये झालेल्या या भव्य सोहळ्यात जगभराचे लक्ष वेधून घेणारी एक चर्चा उघड झाली. ती चर्चा होती मानवी अवयव प्रत्यारोपण आणि मानवाच्या दीर्घायुष्याबद्दल.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे परेडदरम्यान एका हॉट माइकवर संवाद साधताना ऐकले गेले. त्यात त्यांनी असा दावा केला की अवयव प्रत्यारोपणाच्या मदतीने मानवाचे आयुष्य १५० वर्षांपर्यंत वाढवता येऊ शकते. इतकेच नव्हे तर पुतिन यांच्या भाषांतरकाराने म्हटले की “जैवतंत्रज्ञान इतक्या वेगाने प्रगत होत आहे की मानवी अवयवांचे पुनर्स्थापन जवळपास परिपूर्ण पद्धतीने करता येऊ शकते. जितके जास्त वर्षे तुम्ही जगाल तितके तुम्ही तरुणही राहू शकता. कदाचित अमरत्वही मिळवू शकता.” ही चर्चा चीनच्या सरकारी प्रसारक सीसीटीव्हीच्या थेट प्रसारणात कैद झाली. आश्चर्य म्हणजे हा क्लिप जगभरातील प्रेक्षकांनी पाहिला तब्बल १.९ अब्ज ऑनलाइन व्ह्यूज आणि ४० कोटी टीव्ही दर्शकांपर्यंत हा संवाद पोहोचला.
या चर्चेवर नंतर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता पुतिन यांनीही ते मान्य केले. ते म्हणाले “अवयव प्रत्यारोपण, आधुनिक शस्त्रक्रिया पद्धती आणि आरोग्य सुधारणा यांच्या मदतीने मानवाचे सक्रिय जीवनकाल आजच्या तुलनेत खूपच वाढवता येईल. हे विज्ञान मानवाला आशेचा किरण दाखवत आहे.”
विजय परेडच्या मुख्य सोहळ्यात चीनने आपली प्रगत शस्त्रसामग्री प्रदर्शित केली. हायपरसोनिक क्षेपणास्त्रे, मानवरहित नौदल प्रणाली, ड्रोन तंत्रज्ञान आणि इतर अत्याधुनिक शस्त्रास्त्रे पाहून प्रेक्षक थक्क झाले. शी जिनपिंग यांनी आपल्या भाषणात सांगितले “जगासमोर सर्वात कठीण निवड म्हणजे शांतता की युद्ध. चीनने सदैव शांततेचा मार्ग निवडावा, पण आम्ही सज्ज आहोत.” या संदेशातून चीनने केवळ लष्करीच नव्हे तर वैज्ञानिक व आर्थिक शक्ती म्हणून स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Kim Ju Ae : अंतर्गत खेळी की पितृसत्ताक व्यवस्थेला आव्हान? मोठा मुलगा असतानाही किम जोंग उनची मुलगी होणार पुढची हुकूमशहा
या परेडपूर्वी व नंतर रशिया आणि चीनमध्ये २० हून अधिक महत्त्वाचे करार झाले. यात ऊर्जा प्रकल्प, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), पायाभूत सुविधा विकास, तसेच एक महत्त्वाकांक्षी गॅस पाइपलाइन प्रकल्प यांचा समावेश होता. या दौऱ्याला आणखी वजन मिळाले कारण पुतिन हे चीनमध्ये आयोजित एससीओ शिखर परिषदेतही सहभागी झाले. यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीसह जगातील अनेक नेते उपस्थित होते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World Muslim Population : मुस्लिम देशांचा नेता बनण्याचा प्रयत्न करणाऱ्या तुर्कीमध्ये लोक का सोडत आहेत इस्लाम?
जगभरातील लोक आता उत्सुक आहेत खरंच माणूस १५० वर्षे जगू शकतो का? विज्ञान आणि जैवतंत्रज्ञान वेगाने प्रगत होत असले तरी इतक्या दीर्घायुष्याचा दावा अजूनही संशोधनापुरता मर्यादित आहे. मात्र पुतिन-जिनपिंग यांच्या संभाषणामुळे हे जगाच्या मुख्य चर्चेचे केंद्र बनले आहे. काही वैज्ञानिक मान्य करतात की अवयव प्रत्यारोपण, स्टेम सेल थेरपी, जनुकीय उपचार आणि कृत्रिम अवयव निर्मिती यामुळे मानवी आयुष्य मोठ्या प्रमाणात वाढू शकते. परंतु १५० वर्षांचा आकडा अजूनही सैद्धांतिक आहे. तरीही या चर्चेने लोकांमध्ये कुतूहल आणि आशेची नवी लाट निर्माण केली आहे. बीजिंगमधील विजय परेडने जगाला केवळ चीनच्या लष्करी ताकदीची झलक दाखवली नाही, तर “मानव किती काळ जगू शकतो?” या शाश्वत प्रश्नालाही नवे परिमाण दिले. पुतिन-जिनपिंग यांचा हॉट माइक संवाद हा कदाचित मानवी इतिहासातील मोठ्या वैज्ञानिक क्रांतीची सुरुवात ठरू शकतो.