Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today : डॉ. गौरी गर्जे यांची आत्महत्या नसून हत्या; कुटुंबियांचा गंभीर आरोप

Marathi Breaking Live Updates : राजकारण, समाजकारण, गुन्हे, क्रीडा क्षेत्रासह इतर महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींसाठी 'नवराष्ट्र'ला भेट देत राहा...

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 04, 2025 | 06:30 PM
Top Marathi News Today Live : डॉ. गौरी गर्जे यांची आत्महत्या नसून हत्या; कुटुंबियांचा गंभीर आरोप

Top Marathi News Today Live : डॉ. गौरी गर्जे यांची आत्महत्या नसून हत्या; कुटुंबियांचा गंभीर आरोप

Follow Us
Close
Follow Us:

Marathi Breaking News Updates : राज्याच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी गर्जे यांनी आत्महत्या केल्याचे नुकतेच समोर आले आहे. या आत्महत्या प्रकरणावरून अनेक आरोप केले जात आहेत. असे असताना आता ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा गंभीर आरोप गौरी गर्जेच्या कुटुंबियांकडून करण्यात येत आहे. गौरीचा तीन जणांनी मिळून गळा दाबून खून केला, असा आरोप गौरी यांचे वडील अशोक पालवे यांनी केला.

गौरीची आई अलकनंदा पालवे यांनी अनंत गर्जेला मिळालेल्या न्यायालयीन कोठडीवर संशय व्यक्त केला. आरोपी अनंतला या प्रकरणात एवढ्या लवकर न्यायालयीन कोठडी देण्याची गरज नव्हती. कारण, गौरी आत्महत्या करणारी मुलगी नव्हती. ती खंबीर तरुणी होती. आरोपीला एवढ्या लवकर का न्यायालयीन कोठडी दिली?, असा सवाल त्यांनी व्यक्त केला.

The liveblog has ended.
  • 04 Dec 2025 06:22 PM (IST)

    04 Dec 2025 06:22 PM (IST)

    Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाचं काम नेमकं पूर्ण कधी होणार? नितीन गडकरी यांनी सांगितली नवीन डेडलाईन

    किया इंडिया ही ऑटोमोबाइल क्षेत्रातील एक लोकप्रिय कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी आधुनीच फीचर्स आणि सुविधा असणारी वाहने किया (Kia)कंपनी सातत्याने लॉंच करत असते. भारतीय बाजारपेठेत यंदा किया इंडिया कंपनीने तुफानी विक्री केली आहे. आपला मागच्याच वर्षीचा रेकॉर्ड किया इंडिया कंपनीने मोडला आहे. किया इंडिया कंपनीने नोव्हेंबर महिन्यात हजारो गाड्यांची विक्री केली आहे.

  • 04 Dec 2025 06:10 PM (IST)

    04 Dec 2025 06:10 PM (IST)

    Kia ने सबको बुझा दिया! मार्केट हलवून सोडलं; नोव्हेंबरमध्ये तब्बल ‘इतक्या’ वाहनांची केली विक्री

    किया इंडिया ही ऑटोमोबाइल क्षेत्रातील एक लोकप्रिय कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी आधुनीच फीचर्स आणि सुविधा असणारी वाहने किया (Kia)कंपनी सातत्याने लॉंच करत असते. भारतीय बाजारपेठेत यंदा किया इंडिया कंपनीने तुफानी विक्री केली आहे. आपला मागच्याच वर्षीचा रेकॉर्ड किया इंडिया कंपनीने मोडला आहे. किया इंडिया कंपनीने नोव्हेंबर महिन्यात हजारो गाड्यांची विक्री केली आहे.

  • 04 Dec 2025 06:04 PM (IST)

    04 Dec 2025 06:04 PM (IST)

    Hyundai Venue ने लाँचनंतर फक्त एका महिन्यात मिळाली विक्रमी बुकिंग

    नोव्हेंबरमध्ये Hyundai Venue चे नवीन जनरेशन लाँच केले होते. रिपोर्ट्सनुसार, नवीन व्हेन्यूच्या लाँचनंतर फक्त एका महिन्यात या SUV ला ग्राहकांकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत या मॉडेलसाठी 32 हजार युनिट्सची बुकिंग नोंदवली गेली आहे.

  • 04 Dec 2025 05:36 PM (IST)

    04 Dec 2025 05:36 PM (IST)

    भारत सरकारचा मोठा निर्णय! सीतारमणांचा मोठा खुलासा

    केंद्र सरकारने अलीकडेच तंबाखू उत्पादनांवर उत्पादन शुल्क लादण्यासाठी लोकसभेत एक विधेयक सादर केले होते जे मंजूरकरण्यात आले. हा नवीन कायदा किंवा अतिरिक्त कर नाही. तसेच, तंबाखूवर लादलेला हा उत्पादन शुल्क राज्यांसह सामायिक केला जाईल, ज्याचा राज्यांनाही फायदा होईल. असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट केले. तसेच, अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले की, तंबाखू उत्पादनांवर लादलेला उत्पादन शुल्क वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार राज्यांना सामायिक केला जाईल. यामुळे जीएसटी लागू झाल्यानंतर राज्यांच्या होणाऱ्या महसुली नुकसानाची देखील भरपाई होईल. केंद्र सरकार नेहमीच राज्यांचे हित लक्षात घेते आणि कोणत्याही राज्याला आयोगाने ठरवलेल्या रकमेपेक्षा कमी संसाधने मिळत नाहीत यावर लक्ष देते.

  • 04 Dec 2025 05:06 PM (IST)

    04 Dec 2025 05:06 PM (IST)

    Realme ने लॉंच केला ‘हा’ धमाकेदार स्मार्टफोन

    रिअलमी कंपनीने पी सिरिजमधील P4x हा स्मार्टफोन लॉंच केला आहे. यामध्ये 7000 mAh क्षमतेची बॅटरी मिळणार आहे. तसेच 45 वॅटचा चार्जिंग सपोर्ट देखील तुम्हाला मिळणार आहे. हा फोन 5 जी चिपसेट युक्त असणार आहे. यामध्ये कोणकोणते फीचर्स असणार आहेत, ते जाणून घेऊयात. P4x या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.72 इंचाचा fhd+ डिस्प्ले मिळणार आहे. यामध्ये 144 z रिफरेश रेट असणार आहे. हा स्मार्टफोन अँन्ड्रॉईड 15 बेस वर आधारित असणार आहे. मोबाईलचे वजन साधारणतः 208 ग्रॅम इतके आहे.

  • 04 Dec 2025 04:55 PM (IST)

    04 Dec 2025 04:55 PM (IST)

    शिवसेना आणि मनसेच्या युतीचा सोहळा

    मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीबाबत महाविकास आघाडीच्या पक्षांमध्ये मतभेद आणि स्पर्धा आहे. शिवसेना, उद्धव ठाकरे आणि मनसे यांच्यातील युतीमुळे मराठी भाषिक मतांचा फायदा होईल, परंतु जर काँग्रेस स्वतंत्रपणे लढली तर त्यामुळे मतविभाजन होईल. भाजपला मुंबईत गुजराती, राजस्थानी आणि दक्षिण भारतीय मतदारांचा पाठिंबा आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना युती करू शकत नाहीत. उद्धव ठाकरेंना विश्वास आहे की राहुल गांधींच्या मध्यस्थीमुळे काही तोडगा निघेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपद मिळाले हे ते विसरू शकत नाहीत.

  • 04 Dec 2025 04:50 PM (IST)

    04 Dec 2025 04:50 PM (IST)

    ऐन वेळी दुसऱ्या मतदारसंघात नाव, निवडणूक आयोगावर मतदाराचे ताशेरे |

    राज्य निवडणूक आयोगावर रोज नवनवे आरोप तर होतायतचं, पण आता निवडणूक आयोगानेचं आम्हाला बारामती आणि इंदापूरमध्ये घर घेऊन द्यावं. अशी उपरोधिक मागणी ऐनवेळी पत्ता बदललेल्या मतदाराने निवडणूक आयोगाकडे केलीये. आयोगाला अडचणीत आणणारी ही मागणी करणारे पिंपरी चिंचवड मधील शरद पवारांच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष इम्रान शेख आणि त्याचे वडील युनूस शेख हे आहेत. इम्रानचे वडील युनूस शेख यांचं नाव इंदापूर विधानसभेत तर आई रबिया शेख यांचं नाव बारामती विधानसभेत ऐनवेळी ट्रान्स्फर करण्यात आलंय. मुळात इम्रानचं कुटुंब गेल्या 35 वर्षांपासून भोसरी विधानसभेत वास्तव्यास आहेत. 2024च्या विधानसभेला ही इम्रानचे वडील युनूस आणि आई रबिया यांनी भोसरीत मतदान केलंय. याचा पुरावा ही त्यांच्याकडे उपलब्ध आहे. आयुष्यात आमचा बारामती आणि इंदापूर विधानसभेशी कधी संबंध आला नाही, न आम्ही निवडणूक आयोगाकडे आमचं नाव तिकडे ट्रान्स्फर करण्यासाठी अर्ज केला. तरी ही निवडणूक आयोगाने हा स्वतःहून कारभार केलाय, मग आता बारामती आणि इंदापुरच्या त्या पत्त्यावर मला आणि माझ्या पत्नीला त्यांनी घर घेऊन द्यावं. अशी उपरोधिक मागणी करत युनूस शेख यांनी निवडणूक आयोगाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. .

  • 04 Dec 2025 04:45 PM (IST)

    04 Dec 2025 04:45 PM (IST)

    माणगाव येथील टेंबे स्वामींच्या दत्त मंदिरात भक्तांची दर्शनासाठी गर्दी

    दत्तजयंती आज सर्वत्र उत्साहात आणि भक्तीभावात साजरी केली असून कुडाळ तालुक्यातील माणगाव या तीर्थक्षेत्री सकाळपासून भाविकांनी श्री दत्तगुरूंचे दर्शन घेण्यासाठी रांगा लावल्या आहेत. माणगाव येथील दत्त मंदिर श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींनी बांधले आहे. सरस्वतींना दत्तसंप्रदायात श्रीदत्तात्रेयाचे अवतार मानले जाते. या मंदिरात दर्शनासाठी राज्यातून तसेच गोवा, कर्नाटक, गुजरात येथूनही मोठ्या प्रमाणात दत्त भक्त येतात.

  • 04 Dec 2025 04:40 PM (IST)

    04 Dec 2025 04:40 PM (IST)

    पार्थ पवार यांना देखील अटक झाली पाहिजे- अंबादास दानवे

    अमेडीया कंपनी व्यवसाय कंपनी असल्यामुळे 1% आणि ९९ % वाल्यांमध्ये भेद करता येणार नाही यात पार्थ पवार यांना सुद्धा अटक झाली पाहिजे. राजकीय दबावा शिवाय मुद्रांक शुल्क माफ झालेलं नाही राज्यसरकार लपवाछपवीचं काम करत आहे पार्थ पवार यांना देखील अटक झाली पाहिजे, गृहखातं आणि महसूल खातं लपवाछपवी करत आहे

  • 04 Dec 2025 04:35 PM (IST)

    04 Dec 2025 04:35 PM (IST)

    रत्नागिरीची वेदा सरफरे सर्वात लहान जलतरणपटू

    बाळाचे पाय पाळण्यात दिसतात पण या चिमुरडीचे पाय नवव्या महिन्यातच पाण्यात दिसले तेही पोहताना.नऊ महिन्याची असल्यापासून रत्नागिरीच्या शासकीय जलतरण तलावात पोहायला सुरूवात करणाऱ्या वेदा परेश सरफरे हिचा प्रवास अवघ्या १ वर्ष ९ महिन्यांची असताना इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड पर्यंत पोहचला आहे.१०० मीटरचे अंतर १० मिनिटे आणि ८ सेंकदात पूर्ण करत वेदा हिंदुस्थानातील सर्वात लहान जलतरण पटू बनली आहे.

  • 04 Dec 2025 04:35 PM (IST)

    04 Dec 2025 04:35 PM (IST)

    दिव्यांगांनी लुटला झिपलाईन, पॅरामोटरचा आनंद

    अपंगत्वामुळे व्हीलचेअर हे जग बनलेल्या वर्षाराणी सावंत, दिव्यांग सुषमा सावंत व भंडारपुळे येथील स्मिता पाटील यांना रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाऊंडेशनने अनोखी भेट दिली. आरे वारे येथे झिपलाईन आणि मालगुंड येथे पॅरामोटर या धाडसी खेळांचा आनंद या दोघींनी घेतला. यामुळे या दिव्यांगाच्या चेहऱ्यावर हास्य उमलले. दिव्यांगांना अशा प्रकारे पर्यटनस्थळी जाणेच खूप कठीण असते. परंतु दिव्यांगांसाठी सर्व ती मदत करणाऱ्या रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनने अनेकांच्या जीवनात आनंद निर्माण केला आहे. वर्षाराणी श्रीपत सावंत (वय ३४ वर्ष, मु.पो.निर्वाळ बहिरीचीवाडी ता. चिपळूण) हिला वयाच्या २१ व्या वर्षापासुन मस्कुलर डिस्ट्रोफी या आजाराने अपंगत्व आले. हळुहळु अंगातली सर्व ताकद कमी कमी होवु लागली, शरीराचा तोल जावू लागला, पायाचे सांधे दुखायला लागले तसे चालणेही कमी झाले. हातात काठी घेऊन चालत होती. तशा परिस्थितीतही ग्रॅज्युएशन पूर्ण केले. आता घराबाहेर पडता येत नाही. घरातल्या घरातच हळुहळु स्वत:ची कामे करते. बर्‍याच कामात आईची मदत लागते. वर्षाराणीला आता चालणे शक्य नसल्याने घरातच बसावे लागते. अशा परिस्थितीत रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनने तिला पर्यटन सफर घडवली व साहसी खेळांचा आनंद दिला.

  • 04 Dec 2025 04:30 PM (IST)

    04 Dec 2025 04:30 PM (IST)

    दत्तजयंती निमित्त भाविकांची अलोट गर्दी

    उरण शहरात दत्तजयंती निमित्त भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पहाटे पासून भाविकांनी दर्शनाला रांगा लावल्या होत्या, तर यावेळी भाविकांना दर्शनात अडचण येवुनये यासाठी स्वयंसेवक मेहनत घेताना दिसत होते. या दिवशी शहरामध्ये जत्रा भरविण्यात येते. सौंदर्य प्रसाधने, खेळणी, कपडे, मिठाई, यासोबत शोभेच्या वस्तू, आकाश पाळणे, विविध करमणुकीचे खेळ या जत्रेतून नागरिकांना अनुभवायला मिळतात. यामुळेच या जत्रेला उरण तालुक्याप्रमाणेच तालुक्याला बाहेरील नागरिकही हजेरी लावता. यामुळे या जत्रेला दिवसागणिक मोठे स्वरूप येत असून, सध्या ही जत्रा दोन दिवस भरविण्यात येउलागली याबाबत आमचे प्रतिनिधी विरेश मोडखरकर यांनी घेतलेला आढावा.

  • 04 Dec 2025 04:30 PM (IST)

    04 Dec 2025 04:30 PM (IST)

    भाईंदर रेल्वेस्थानकात दिव्यांग महिलेस मारहाण; मनसेचा 48 तासांचा अल्टिमेटम

    रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) काही पोलिसांनी एका अंध दिव्यांग महिलेस मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार भाईंदर रेल्वेस्थानक परिसरात घडला आहे. संध्याकाळच्या सुमारास संबंधित महिला रेल्वे पुलाजवळ वजनकाटा व दिनदर्शिका विकण्यास बसलेली असताना पोलिसांनी तिला तेथून हटण्यास सांगितले. यावेळी तिच्या कानाखाली मारहाण करण्यात आली तसेच अंगावर पाणी फेकून तिचा छळ केला, असा आरोप मनसे व मराठी एकीकरण समितीने केला आहे.

  • 04 Dec 2025 04:25 PM (IST)

    04 Dec 2025 04:25 PM (IST)

    गुन्हा नोंद करण्यास आधार नसल्याने पनवेल पोलिसांकडून बिवलकर यांना क्लीनचीट.....

    परिक्षेत्र वन अधिकारी उरण यांनी मानवी राखीव वन आणि सरकारी क्षेत्रावर अनियमितता व शासनाची दिशाभूल करून वन विभाग व राज्य सरकार यांची आर्थिक फसवणूक केल्याबाबत बिवलकर यांच्या विरोधात पनवेल पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. सदर प्रकरणाने राजकीय वळण घेतल्याने त्याचा मोठा गाजावाजा झाला होता. मात्र या तक्रारीच्या अनुषंगाने तपास करून पोलीस खात्याने तपासाच्या दृष्टीने कार्यवाही केली असता, वन विभाग आणि महसूल विभाग पोलीस विभागाकडे आवश्यक कागदपत्रे सादर करता आली नाहीत. त्यामुळे पोलिसांनी बिवलकर यांना या प्रकरणी क्लीन चीट दिली आहे.

  • 04 Dec 2025 04:20 PM (IST)

    04 Dec 2025 04:20 PM (IST)

    श्रमजीवी कामगार रयत संघटनेचे केडीएमसी समोर ठिय्या आंदोलन

    कल्याण डाेंबिवली महापालिकेतल कंत्राटी कामगारांच्या मागण्यांसाठी गुरुवारी श्रमजीवी कामगार रयत संघटनेच्या वतीने महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी कामगारांच्या मागण्यासाठी मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या देऊन आंदोलन करण्यात आले. महापालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त करण्यात आला.

  • 04 Dec 2025 04:13 PM (IST)

    04 Dec 2025 04:13 PM (IST)

    मुंबईतील इरा जोशी हीने कोरले गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मधे नाव

    मुंबईतील जोगेश्वरी मसाजवाडी येथील १० वर्षांच्या चिमुकल्या इरा संपदा पराग जोशी हीने एका मिनिटात (हूला हुप घूमाव) पायात१७३ वेळा रींग फीरवणेचा विक्रम करआपले नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मधे नोंद करण्यात यश मिळविले आहे.

  • 04 Dec 2025 04:00 PM (IST)

    04 Dec 2025 04:00 PM (IST)

    समरच्या आरोग्यासाठी स्वानंदीने घेतला योग आणि प्राणायाम शिकवण्याचा निर्णय

    ‘वीण दोघांतली ही तुटेना‘ मालिकेत समर–स्वानंदीच्या कुटुंबात घडलेल्या अलीकडील घटनांनी घरातील वातावरणाला नवे वळण दिले आहे. स्वानंदीच्या वडिलांनी राजवाडे घरातील दागिन्यांवर घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ही रक्कम राजवाडे यांच्या घरी परत देण्यासाठी जात असताना अंशुमनने गुंडांकरवी ती रक्कम चोरी केली, ज्यामुळे स्वानंदीची बाबा अत्यंत दुःखी झाले. ही परिस्थिती हाताळताना स्वानंदीने पोलिसांची मदत घेऊन चोरी गेलेली रक्कम शोधून काढली आणि ती त्वरित राजवाडे कुटुंबाकडे परत दिली. तिच्या या प्रामाणिक आणि निर्णायक कृतीमुळे बाबा आणि समरमधील तणाव कमी झाला. समरला प्रथमच जाणवलं की या घरातील सर्वजण वाईट नाहीत आणि गैरसमजांवर पडदा टाकण्याची वेळ आली आहे. 

    वाचा सविस्तर 

  • 04 Dec 2025 03:50 PM (IST)

    04 Dec 2025 03:50 PM (IST)

    निवडणूक प्रक्रियेवर जनतेचा विश्वास डळमळीत

    यवत : नुकत्याच झालेल्या नगरपरिषद व नगर पंचायत मतदान प्रक्रियेदरम्यान जिल्ह्यासह राज्यभर अनेक ठिकाणी घडलेल्या गैरप्रकारांमुळे निवडणूक व्यवस्थेवर नागरिकांचा विश्वास मोठ्या प्रमाणात ढासळला आहे. लोकशाही मूल्यांना काळिमा फासणारे प्रकार उघड होत असल्याने सामान्य मतदार, कार्यकर्ते तसेच राजकीय क्षेत्रात प्रचंड असंतोष व्यक्त केला जात आहे. मतदानादरम्यान बोगस मतदान, बोगस मतदार याद्या, मतदारांवर दबाव, दहशत, मारहाण, गुंडगिरी, पैसेवाटप अशी गंभीर प्रकरणे मोठ्या प्रमाणात उघडकीस आली आहेत. प्रसारमाध्यमांमधून या घटना जनतेसमोर आल्याने कार्यकर्त्यांपासून सामान्यजनांपर्यंत सर्वांमध्ये भीती आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.

    वाचा सविस्तर 

  • 04 Dec 2025 03:40 PM (IST)

    04 Dec 2025 03:40 PM (IST)

    नैवेद्यासाठी नेमकं काय बनवावं सुचत नाही?

    मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी देवीची घटस्थापना करून मनोभावे पूजा केली जाते. तसेच देवीला वेगवेगळ्या गोड पदार्थांचा नैवेद्य सुद्धा दाखवला जातो. नैवेद्यातील गोड पदार्थांमध्ये शिरा, शेवयांची खीर, तांदळाची खीर, गुलाबजाम, पुरणपोळी इत्यादी ठराविक पदार्थ कायमच बनवले जातात. पण आज आम्ही तुम्हाला साजूक तुपातील मूगडाळीचा शिरा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. मूगडाळीचा शिरा चवीला अतिशय सुंदर लागतो. कमीत कमी साहित्यात कोणताही गोड पदार्थ बनवायचा असल्यास तुम्ही मूगडाळीचा शिरा बनवू शकता. मुगाची डाळ सहज पचन होते. मधुमेह किंवा आरोग्यासंबंधित इतर समस्यांनी त्रस्त असलेले लोक जास्त गोड पदार्थांचे सेवन करत नाहीत. अशा रुग्णांसाठी तुम्ही मूगडाळीचा सहज पचन होणारा चविष्ट शिरा बनवू शकता. कमीत कमी साहित्यात झटपट बनवले जाणारे पदार्थ घरातील कोणत्याही कार्यक्रमांच्या दिवशी तुम्ही बनवू शकता. चला तर जाणून घेऊया मुगडाळ शिरा बनवण्याची सोपी रेसिपी.

    वाचा सविस्तर 

  • 04 Dec 2025 03:30 PM (IST)

    04 Dec 2025 03:30 PM (IST)

    ‘साई बाबा’ फेम सुधीर दळवी यांची मृत्यूशी झुंज,

    टीव्हीवर साईबाबांची भूमिका साकारून अभिनेता सुधीर दळवी यांनी खूप प्रसिद्धी मिळवली. आता गेल्या काही काळापासून त्यांच्या आरोग्याच्या समस्यांमुळे चर्चेत आहे. अभिनेते खूप कठीण काळातून जात आहेत आणि त्यांना सेप्सिस इन्फेक्शन झाले आहे. त्यांच्या कुटुंबाने त्यांच्या उपचारांसाठी आर्थिक मदत मागितली होती. आता, अभिनेत्याच्या कुटुंबाला दिलासा मिळाला आहे. शिर्डी संस्थान त्यांना मदत करण्यासाठी पुढे आले आहे आणि मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची मंजुरी दिली आहे.

    वाचा सविस्तर

  • 04 Dec 2025 03:20 PM (IST)

    04 Dec 2025 03:20 PM (IST)

    Chhattisgarh encounter : दंतेवाडा-बिजापूर सीमेवर आतापर्यंत 16 नक्षलवादी ठार

    Chhattisgarh encounter news Marathi : काही दिवसांपासून सुरु असलेल्या छत्तीसगडच्या बिजापूर-दंतेवाडा सीमेवर सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये मोठी चकमक उडाली आहे. छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील बस्तर रेंजमध्ये सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांवर निर्णायक कारवाई सुरू केली आहे. बिजापूर-दंतेवाडा जिल्हा सीमेवर असलेल्या पश्चिम बस्तर विभाग परिसरात सुरू असलेल्या शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली. 3 डिसेंबर रोजी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी १२ माओवाद्यांना ठार मारले. या चकमकीत बीजापूर डीआरजीचे तीन जवानही शहीद झाले. सुरक्षा दलांनी ही कारवाई एका नवीन रणनीतीअंतर्गत केली असल्याची माहिती समोर आली.

    वाचा सविस्तर 

  • 04 Dec 2025 03:10 PM (IST)

    04 Dec 2025 03:10 PM (IST)

    Soup Recipe : हा 1 सूप पिताच एका महिन्यात कमी होईल 10 किलो वजन!

    चुकीचा आहार आणि व्यायामाचा अभाव या कारणांमुळे कमी वेळातच आपले भरपूर वजन वाढू लागते. एकदा का आपले वजन वाढले की मग लवकर हे वजन कमी करणे फार कठीण होते. लठ्ठपणा कमी करण्यासाठी, काही व्यायाम करणे, आहारावर नियंत्रण ठेवणे आणि अन्नात निरोगी गोष्टींचा समावेश करणे सर्वात महत्वाचे आहे.

    वाचा सविस्तर

  • 04 Dec 2025 03:05 PM (IST)

    04 Dec 2025 03:05 PM (IST)

    14 वर्षीय Vaibhav Suryavanshi ने पुन्हा घातला धुमाकुळ!

    भारताच्या अंडर 19 संघ लवकरच आशिया कप खेळण्यासाठी जाणार आहे. या संघाचे कर्णधारपद हे आयुष म्हात्रेकडे असणार आहे. तर या संघाचा भाग वैभव सूर्यवंशी देखील असणार आहे. त्याआधी आयपीएल स्टार आणि भारताचा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी सध्या आशिया कप आधी सय्यद मुश्ताक अली स्पर्धा खेळत आहे. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीची बॅट जोरदार सुरू आहे. महाराष्ट्राविरुद्ध शतक झळकावल्यानंतर वैभवने गोव्याच्या गोलंदाजांनाही चांगलेच धारेवर धरले आहे.

    वाचा सविस्तर 

  • 04 Dec 2025 02:55 PM (IST)

    04 Dec 2025 02:55 PM (IST)

    पोलीस आणि नक्षलवाद्यांच्या छत्तीसगडमधील चकमकीत तीन पोलीस शहीद

    पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये छत्तीसगडमध्ये चकमक झाली. पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये सुमारे साडेचार ते पाच तास चकमक झाली. त्यात बारा नक्षलवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले. छत्तीसगड पोलिसांनी चार जणांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. दरम्यान चकमकीदरम्यान चार पोलिसही शहीद झाले आहेत. पोलिसांनी या भागात आज पहाटे सर्च ऑपरेशन करण्यात आले.

  • 04 Dec 2025 02:50 PM (IST)

    04 Dec 2025 02:50 PM (IST)

    NPSTला गुंतवणुकीचा ‘जॅकपॉट’ !

    डिजिटल पेमेंट्स आणि डिजिटल बँकिंगसाठी पायाभूत यंत्रणा पुरविणारी अग्रगण्य कंपनी नेटवर्क पीपल सर्व्हिस टेक्नोलॉजीज लि. (NPST) ने टाटा म्युच्युअल फंडद्वारे संपूर्ण सदस्यता घेण्यात आलेल्या प्रिफरेन्शियल इश्युच्या माध्यमातून 300 कोटींहून अधिक निधी यशस्वीपणे उभारल्याची घोषणा केली. प्रिफरेन्शियल इश्युअंतर्गत देण्यात आलेल्या 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या, संपूर्ण मूल्य चुकते केलेल्या 14,46,500 इक्विटी शेअर्सच्या लिस्टिंगसाठी कंपनीला NSE व BSE दोहोंकडूनही संमती मिळाली आहे.

  • 04 Dec 2025 02:40 PM (IST)

    04 Dec 2025 02:40 PM (IST)

    राज निदिमोरू आणि समांथाच्या लग्नावर Ex पत्नी श्यामलीने आता सोडले मौन!

    दिग्दर्शक राज यांची एक्स पत्नी श्यामली डे हिने अखेर समंथा रूथ प्रभु आणि राज निदिमोरू यांच्या लग्नावर मौन सोडले आहे. या जोडप्याच्या लग्नाच्या चार दिवसांनंतर, श्यामली ने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली जी व्हायरल होत आहे. श्यामलीची ही पोस्ट पाहून लोक तिला सपोर्ट करताना दिसत आहेत. तसेच ती किती वाईट काळातून जात आहे हे देखील तिने उघड केले आहे.

  • 04 Dec 2025 02:35 PM (IST)

    04 Dec 2025 02:35 PM (IST)

    ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ मधील गाणं ‘शाळा मराठी’ प्रदर्शित!

    मराठी माध्यमातील शाळांची संस्कारमूल्ये, त्या शाळांनी घडवलेली पिढी आणि शिक्षकांनी दिलेला अमूल्य वारसा ही सगळी शाळेची माया पुन्हा अनुभवायला मिळणार आहे. ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ या चित्रपटातील नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘शाळा मराठी’ हे पाहिलं मराठी गाणं रिलीज झालं आहे. काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी 'क्रांतिज्योतीचे संगीत कारभारी' असे म्हणत ‘द फोल्क आख्यान’ च्या हर्ष-विजय आणि ईश्वर सोबत पाच दमदार गाणी चाहत्यांच्या भेटीला येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यातील पहिले ‘शाळा मराठी’ हे शाळेची आठवण जागं करणारे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

  • 04 Dec 2025 02:27 PM (IST)

    04 Dec 2025 02:27 PM (IST)

    राज्यपाल नियुक्त आमदारांविरोधातील याचिकेवर आज सुनावणी

    तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळातील राज्यपाल नियुक्त आमदारांविरोधात उच्च न्यायालयात दाखल याचिकेवरील सुनावणी आज कोल्हापुरातील सर्किट बेचमध्ये होणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख आणि माजी नगरसेवक सुनील मोदी यांनी ही याचिका दाखल केली आहे.

  • 04 Dec 2025 02:17 PM (IST)

    04 Dec 2025 02:17 PM (IST)

    विदेशी राष्ट्रप्रमुखांसोबत विरोधी पक्षनेत्याला भेटू दिले जात नाही – राहुल गांधी

    लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा गंभीर आरोप, सरकारही परदेशात जाऊन विरोधकांना भेटू नका म्हणते, सरकारच नव्हे तर आम्हीही देशाचे प्रतिनिधी करत आहे.

  • 04 Dec 2025 02:07 PM (IST)

    04 Dec 2025 02:07 PM (IST)

    शिंगवे येथील एकमुखी दत्त यात्रेला सुरुवात

    नाशिकच्या पुर्व भागातील मनमाड नजिकच्या शिंगवे येथील टेकडीवरील एकमुखी दत्त यात्रेला मोठ्या उत्सहात सुरुवात झालीय,पुर्व भागातील ही पहिली यात्रा असून उत्तर महाराष्ट्रातील महानुभव पंथीयांचे श्रद्धास्थान व भक्तांची मनोकामना पुर्ण करणारे दत्त अशी सर्वदूर ख्याती असल्याने जिल्हाभरातून भाविकांची मोठी गर्दी येथे दर्शनाला होत असते.तीन दिवस चालणा-या यात्रेत विविध कार्यक्रमांचे आयोजन यात्रा कमेटी व ट्रस्ट तर्फे करण्यात आले आहे.

  • 04 Dec 2025 02:01 PM (IST)

    04 Dec 2025 02:01 PM (IST)

    विद्यार्थ्यांना जादू टोण्यासारखा प्रकार करून तलब जिहाद मध्ये अडकवण्याचा प्रयत्न

    अहिल्यानगर शहरातील एका खाजगी शाळेत ९ वी मध्ये शिकणाऱ्या १३ वर्षाची अल्पवयीन मुलीला त्या शाळेतील एका महिला शिक्षकेने जादू टोण्यासारखा प्रकार करून तलब जिहाद या मध्ये अडकवण्याचा प्रकार केलेला समोर आला असून यामुळे पालकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. नववी मध्ये शिकणाऱ्या एका मुलीस महिला शिक्षकेने काही दिवस विश्वासात घेऊन इस्लाम धर्माविषयी सांगत तिला याबद्दल माहिती घेण्यासाठी इंस्टाग्राम आयडी उघडून दिले .

  • 04 Dec 2025 01:55 PM (IST)

    04 Dec 2025 01:55 PM (IST)

    सुप्त क्षय जीवाणूंवर न होणाऱ्या उपचाराचे रहस्य!

    प्रभावी औषधे आणि व्यापक लसीकरण मोहीम असूनही क्षयरोगावर पूर्ण नियंत्रण मिळवणे अजूनही आव्हानात्मक ठरत आहे. उपचार सुरू असताना शरीरात सुप्त अवस्थेत लपून बसणाऱ्या टीबी जीवाणूंमुळे हा आजार पुन्हा डोके वर काढू शकतो. या सुप्त जीवाणूंना अँटिबायोटिक्सचा परिणाम कमी का होतो? याचे रहस्य अखेर उलगडल्याचे भारतीय संशोधकांनी दावा केला आहे. आयआयटी मुंबई आणि ऑस्ट्रेलियातील मोनॅश विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या संयुक्त अभ्यासात याचे कारण स्पष्ट केले. क्षयरोग निर्मूलनाच्या दिशेने हा अभ्यास महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो, असे संशोधकांचे मत आहे.

  • 04 Dec 2025 01:45 PM (IST)

    04 Dec 2025 01:45 PM (IST)

    तर… ‘या’ दिवशी होणार नृत्यांगना संस्कृती बालगुडेच्या “संभवामी युगे युगे” चा पहिला शो!

    कृष्ण रुपात दिसणारी संस्कृती आणि सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या तिच्या या लूकच सर्वत्र कौतुक होताना दिसते आहे. आणि हा खास लूक आणि तिच्या मनाच्या अगदी जवळच्या असलेला हा प्रोजेक्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी संस्कृतीने सोशल मीडियावर तिच्या या नव्या लूक आणि प्रोजेक्ट बद्दल सांगितल होत. “संभवामी युगे युगे” हा तिचा पहिला वहिला डान्स ड्रामा लवकरच प्रेक्षकांना अनुभवयाला मिळणार असून साता समुद्रापार दुबई मध्ये याचा पहिला शो येत्या २० डिसेंबर २०२५ रोजी पार पडणार आहे.

  • 04 Dec 2025 01:35 PM (IST)

    04 Dec 2025 01:35 PM (IST)

    रुपया कोसळला, डॉलरने मोडले सर्व विक्रम! सामान्य माणसावर थेट फटका

    अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया दररोज घसरत आहे, प्रति डॉलर 90.14 चा विक्रमी नीचांक आहे. हा रुपयाचा सर्वकालीन नीचांक आहे. ही घसरण अशा वेळी झाली आहे जेव्हा भारताचा जीडीपी वेगाने वाढत आहे. रिझर्व्ह बँकेची एमपीसी बैठक देखील सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत, रिझर्व्ह बँक रुपयाबाबत मोठी पावले उचलू शकते. हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

  • 04 Dec 2025 01:25 PM (IST)

    04 Dec 2025 01:25 PM (IST)

    पाकिस्तानच्या सत्ताकाठावर पडझड सुरूच!

    पाकिस्तानमधील (Pakistan) संवैधानिक दुरुस्ती व लष्करी नेतृत्वात बदल झाल्याने, पाकिस्तानमध्ये येत्या काळात लोकशाहीचा अगदीच झगमगाट नाहीसा होण्याची शक्यता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर ४९ अमेरिकन काँग्रेस सदस्यांनी संयुक्तपणे United States Congress तर्फे पत्र लिखित स्वरूपात Marco Rubio यांना पाठवले आहे. त्यात त्यांनी स्पष्ट म्हटले आहे की, असीम मुनीर (Asim Munir) नावाच्या लष्करी अधिकाऱ्यांनी देशात “हुकूमशाहीचे पुनरुत्थान” करण्यासाठी योजना आखली आहे.

  • 04 Dec 2025 01:15 PM (IST)

    04 Dec 2025 01:15 PM (IST)

    तासगावात मतदानाचा घटलेला टक्का कोणाचे गणित बिघडवणार? कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम

     तासगाव नगरपालिका निवडणुकीत मंगळवारी झालेल्या मतदानात ७०.४६ टक्क्यांची नोंद झाली असून, गत निवडणुकीच्या तुलनेत टक्केवारी घटल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. मतदानाची अधिकृत अंतिम आकडेवारी रात्री उशिरापर्यंत उपलब्ध नव्हती; मात्र घटलेला टक्का कोणाच्या बाजूने झुकेल आणि कोणाला धक्का देईल? या प्रश्नावर राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. नगराध्यक्षपदासाठी ५ उमेदवार आणि २४ नगरसेवकांसाठी तब्बल ८८ उमेदवार रिंगणात असल्याने स्पर्धा चुरशीची होती.

  • 04 Dec 2025 01:06 PM (IST)

    04 Dec 2025 01:06 PM (IST)

    पुणे जमीन घोटाळा प्रकरणी अंबादास दानवे यांचे सरकारला चार प्रश्न

    मुंढवा आणि कोरेगाव पार्क जमीन घोटाळा प्रकरणी शीतल तेजवानी हिला पुणे पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. सरकारी जमीन हडपल्याचा आरोपाखाली तिला अटक करण्यात आली. मात्र या जमीन व्यवहार प्रकरणामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांचे देखील नाव आले होते. मात्र पार्थ पवार यांचे नाव एफआयआरमध्ये न आल्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच सत्ताधारी महायुतीवर निशाणा साधला आहे.

  • 04 Dec 2025 01:00 PM (IST)

    04 Dec 2025 01:00 PM (IST)

    निर्दयी बापाकडून 2 अल्पवयीन मुलींवर तीन महिने अत्याचार

    नागपूरमध्ये बापानेच 9 आणि 12 वर्षीय मुलींवर तीन महिने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार. 14 वर्षीय भावाने मदत मागितल्याने तृतीयपंथीयांनी घरात घुसून मुलींना वाचवले व आरोपीला पोलिसांकडे दिलं.

  • 04 Dec 2025 12:50 PM (IST)

    04 Dec 2025 12:50 PM (IST)

    जळगावात 19 वर्षीय तरुणाची बेदम मारहाणीत हत्या

    जळगावात 19 वर्षीय तुषार तायडेची सात-आठ जणांनी बेदम मारहाण करून हत्या केली. जुन्या वादातून Instagram व्हिडिओवरून हल्ला झाल्याची माहिती. आठ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल, आरोपी फरार असून नातेवाईकांनी रस्ता रोको आंदोलन केले.

  • 04 Dec 2025 12:40 PM (IST)

    04 Dec 2025 12:40 PM (IST)

    कुख्यात लोंढे टोळीचा भूषण लोंढेला नेपाळ बॉर्डरवरून अटक

    नाशिक पोलिसांनी दोन महिन्यांपासून फरार असलेला कुख्यात लोंढे टोळी सदस्य भूषण लोंढे याला यूपी-नेपाळ सीमेवर अटक केली. पळून जाण्यासाठी 34 फुटावरून उडी मारत तो जखमी झाला. खून, खंडणीसह अनेक गुन्ह्यांमध्ये तो वाँटेड होता.

  • 04 Dec 2025 12:30 PM (IST)

    04 Dec 2025 12:30 PM (IST)

    यवतमाळमध्ये अनैतिक संबंधाच्या संशयातून खून

    यवतमाळमध्ये अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने पत्नीच्या प्रियकराची हत्या केली. लाकडी दांड्याने मारहाण करून त्याचा जागीच मृत्यू झाला. आरोपी अटकेत असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

  • 04 Dec 2025 12:20 PM (IST)

    04 Dec 2025 12:20 PM (IST)

    डॉ. गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट; कुटुंबियांनी केला ‘हा’ गंभीर आरोप

    भाजप नेत्या तथा मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी गर्जे यांनी आत्महत्या केल्याचे नुकतेच समोर आले आहे. आता ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा गंभीर आरोप गौरी गर्जेच्या कुटुंबियांकडून करण्यात येत आहे. गौरीचा तीन जणांनी मिळून गळा दाबून खून केला, असा आरोप गौरी यांचे वडील अशोक पालवे यांनी केला.

  • 04 Dec 2025 12:12 PM (IST)

    04 Dec 2025 12:12 PM (IST)

    भांडण सोडवण्यासाठी गेला अन् ब्लेडने हल्ला झाला

    छत्रपती संभाजीनगरमध्ये भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या मजुरावर दारुच्या नशेत असलेल्या एकाने ऑपरेशन ब्लेडने हल्ला करुन गंभीर जखमी केले. ही घटना हसूल परिसरातील जहांगीर कॉलनीत घडली.

  • 04 Dec 2025 12:05 PM (IST)

    04 Dec 2025 12:05 PM (IST)

    प्रदूषणाच्या मुद्द्यावर लोकसभेत स्थगन प्रस्ताव

    काँग्रेस खासदार विजय कुमार उर्फ ​​विजय वसंत यांनी दिल्ली-एनसीआर आणि उत्तर भारतातील मोठ्या भागांमधील वायू प्रदूषणाच्या मुद्द्यावर लोकसभेत स्थगन प्रस्तावाची सूचना दिली.

  • 04 Dec 2025 11:55 AM (IST)

    04 Dec 2025 11:55 AM (IST)

    इंडिगोची 200 उड्डाणे रद्द, पुणे, मुंबई विमानतळावर मोठी गर्दी

    आज सकाळी दिल्लीहून निघालेल्या इंडिगोच्या 30 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली. सकाळपासूनच दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांब रांगा लागल्या होत्या, अनेक प्रवाशांनी संपूर्ण रात्र त्यांच्या उड्डाणांच्या प्रतीक्षेत घालवली. हैदराबादमध्येही सुमारे 33 उड्डाणे रद्द करण्यात आली. आज देशभरात इंडिगोच्या 170 हून अधिक उड्डाणे रद्द होण्याची शक्यता आहे. ती. बेंगळुरूमध्ये 42, दिल्लीत 38, मुंबईहून 33, हैदराबादमध्ये 19, अहमदाबादमध्ये 25, इंदूरमध्ये 11, कोलकातामध्ये 10 आणि सुरतमध्ये 8 उड्डाणे रद्द करण्यात आली.

  • 04 Dec 2025 11:45 AM (IST)

    04 Dec 2025 11:45 AM (IST)

    रूग्णालयातील ऑपरेशन थिएटरमध्ये मांसाचे गोळे

    अकोल्यामध्ये आरोग्य केंद्रात अवैध गर्भपात होत असल्याचा संशय खुद्द सरकारमधील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. या आरोग्य केंद्राचं 'स्टिंग ऑपरेशन'च अमोल मिटकरींनी केले. त्यांना रूग्णालयातील ऑपरेशन थिएटरमध्ये मांसाचे गोळे आढळलेत. त्यामूळे या आरोग्य केंद्रात अवैध गर्भपात होत असल्याची गंभीर आणि धक्कादायक आरोप आमदार अमोल मिटकरींनी केला आहे.

  • 04 Dec 2025 11:35 AM (IST)

    04 Dec 2025 11:35 AM (IST)

    जय पवारांच्या लग्नाला पवार कुटुंबियांची दांडी

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांचा शाही विवाहसोहळा बहरीनमध्ये आयोजित करण्यात आला आहे. येत्या ४ ते ७ डिसेंबर या कालावधीत हा विवाहसोहळा पार पडणार आहे. जय पवार आणि ऋतुजा पाटील यांच्या या शाही विवाहसोहळ्यासाठी बहरीनमध्ये जोरदार तयारी सुरु आहे. मीडिया रिपोर्टनुसार, जय पवार यांच्या लग्नाला अजित पवारांचे सख्खे लहान भाऊ श्रीनिवास पवार आणि त्यांच्या पत्नी उपस्थित राहणार नाही. त्यासोबतच शरद पवार, सुप्रिया सुळे हे देखील लग्नाला जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

  • 04 Dec 2025 11:25 AM (IST)

    04 Dec 2025 11:25 AM (IST)

    पुणे जमीन घोटाळ्याप्रकरणी पार्थ पवारांवर कारवाई केव्हा? अंबादास दानवेंचा सवाल

    पुणे जमी घोटाळा प्रकरणी शीतल तेजवानीला अटक झाल्यानंतर पुन्हा एकदा पार्थ पवारांवर कारवाईची मागणी केली जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंंबादास दानवे यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन चार प्रश्न उपस्थित केले आहेत. यामध्येलिहिले की, पुण्याच्या जमीन प्रकरणात शीतल तेजवानीला 'अखेर' अटक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे जी, या प्रश्नांची उत्तरे जनता मागते आहे.. १. जमीन देणारी व्यक्ती अटकेत असेल तर मग घेणाऱ्या व्यक्तीला, त्याच्या पार्टनरला अटक का नाही? २. पार्थ पवार प्रकरणात कंपनीने उत्तर देण्यासाठी अजून किती दिवस 'मुदतवाढ-मुदतवाढ' खेळणार आहात? ३. अमेडिया कंपनीत केवळ १ टक्का भागधारक दिग्विजय हा ९९ टक्के भागधारक असलेल्या पार्थ पवारांच्या मर्जीशिवाय सायनिंग अथॉरिटी झाला का? ४. मुद्रांक शुल्क माफ करणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे सरकार कधी जाहीर करणार? ही शुल्क माफी राजकीय दबावाशिवाय होणे शक्य नाही महोदय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याची कल्पना नाही असे सांगणे, हे जनतेला शुद्ध वेडे बनवणे आहे. ते ही बहुमताच्या जोरावर!, असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला आहे.

     

  • 04 Dec 2025 11:15 AM (IST)

    04 Dec 2025 11:15 AM (IST)

    महाराष्ट्रात Digital 7/12 ला कायदेशीर मान्यता - महसूल विभागाचा निर्णय

    महसूल विभागात डिजिटल क्रांती आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या धडाकेबाज निर्णयाची सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे. चिरमिरी घेण्याच्या पद्धतीला आळा घालण्यासाठी Digital 7/12 ला मंजूरी देण्यात आली आहे. याविषयीचे शासन परिपत्रक प्रसिद्ध झाले आहे. त्याचा राज्यातील कोट्यवधी जनतेला मोठा फायदा होणार आहे.

  • 04 Dec 2025 11:05 AM (IST)

    04 Dec 2025 11:05 AM (IST)

    सर्वत्र आंतरराष्ट्रीय बँक दिन साजरा

    आंतरराष्ट्रीय बँक दिन दरवर्षी 4 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाने 2019 मध्ये हा दिवस घोषित केला, ज्यामागील उद्दिष्ट म्हणजे जागतिक बँकिंग व्यवस्थेच्या महत्त्वाला अधोरेखित करणे आणि टिकाऊ आर्थिक विकासासाठी त्यांचे योगदान ओळखणे होय. बँका आर्थिक स्थिरतेचे आणि प्रगतीचे केंद्रस्थान आहेत. त्या केवळ व्यक्तींना बचत आणि कर्जाच्या सुविधा पुरवण्याचे कार्य करत नाहीत, तर देशाच्या आर्थिक व्यवस्थेला आधार देतात. लहान व्यवसायांना भांडवल उपलब्ध करून देणे, महिलांना आर्थिक स्वावलंबनासाठी मदत करणे, आणि गरिबी निर्मूलनासाठी विविध योजना राबवणे या क्षेत्रात बँकांची भूमिका महत्त्वाची आहे.

Web Title: Top news marathi breaking news live updates international news national news crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2025 | 09:12 AM

Topics:  

  • international news
  • Navarashtra live Upadates

संबंधित बातम्या

Australia Burqa Ban: ‘संसदेत बुरख्याविरुद्ध निषेध…’ आणि सेलिब्रिटी बनली ‘ही’ ऑस्ट्रेलियन खासदार, काय आहे संपूर्ण प्रकरण?
1

Australia Burqa Ban: ‘संसदेत बुरख्याविरुद्ध निषेध…’ आणि सेलिब्रिटी बनली ‘ही’ ऑस्ट्रेलियन खासदार, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Ban Munir: पाकिस्तानच्या सत्ताकाठावर पडझड सुरूच! असीम मुनीर प्रकरणात अमेरिकाही सहभागी; 49 कायदेकर्त्यांनी केली ‘ही’ मागणी
2

Ban Munir: पाकिस्तानच्या सत्ताकाठावर पडझड सुरूच! असीम मुनीर प्रकरणात अमेरिकाही सहभागी; 49 कायदेकर्त्यांनी केली ‘ही’ मागणी

व्लादिमीर पुतिन यांच्या दौऱ्यापूर्वीच रशियाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय; भारताला होणार फायदा
3

व्लादिमीर पुतिन यांच्या दौऱ्यापूर्वीच रशियाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय; भारताला होणार फायदा

Highest Debt Country : जागतिक अर्थव्यवस्थेला कर्जाचा विळखा; जाणून घ्या 2025 मध्ये सर्वात जास्त कर्जबाजारी देश कोणते आहेत
4

Highest Debt Country : जागतिक अर्थव्यवस्थेला कर्जाचा विळखा; जाणून घ्या 2025 मध्ये सर्वात जास्त कर्जबाजारी देश कोणते आहेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.