महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची हुल्लडबाजी (फोटो- टीम नवराष्ट्र)
महाबळेश्वर: संपूर्ण महाराष्ट्राचे फेवरेट डेस्टिनेशन असणारे महाबळेश्वर येथील वेण्णा लेक पार्किंग सध्या भलतेच चर्चेत आहे. इंस्टाग्राम फेसबुक या वरती रिल बनवण्याच्या नादात तरुण वर्ग येथील पार्किंग मध्ये चार चाकी गाड्यांचे जीवघेणे स्टंट करताना आढळून येत आहेत. सध्या महाबळेश्वर मध्ये सुरू असणाऱ्या पावसामुळे येथील पार्किंगमध्ये साचलेल्या चिखलामधून भरधाव वेगाने गाडी नेत जागेवर गाडी गोल गोल फिरवणे चिखल उडविणे असे वेगवेगळे स्टंट केले जात आहेत.
चिखलाने माखलेल्या गाड्या रस्त्यावरून फिरवत गाड्या पाहून इथे फिरायला येणाऱ्या पर्यटकांच्या चेहऱ्यावरील हाव भाव टिपून त्याचे रील बनवत लाखो लाईक मिळवण्यासाठी असे टुकार स्टंट सध्या महाबळेश्वर येथील वेण्णा लेक पार्किमध्ये चालू आहेत.
महाबळेश्वर येथील वेण्णा लेक म्हणजे पर्यटकांचे आवडते ठिकाण. बऱ्याच मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे भेट देत असतात. वेण्णा लेक येथे नगरपरिषदे मार्फत चालवले जाणारे बोटिंग वनविभागाचे प्रतापसिंह पार्क खाद्य पदार्थाचे स्टॉल येथे असणारे गेम झोन एवढ्या प्रमाणात मनोरंजन साठी सोयी असताना देखील हुल्लड बाज पर्यटकांची नको ती हुल्लडबाजी सुरू आहे .
येथील पार्किंग मध्ये पर्यटकांच्या हजारो गाड्या पार्किंग साठी येत असतात पार्किंगच्या बाजूने असणाऱ्या ट्रॅक वरती येथील घोडे व्यावसायिक व्यवसाय करीत असतात या मुळे या भागात पर्यटकांची लहान मुले वयो वृद्धांसह वर्दळ देखील मोठ्या प्रमाणात असते असे असताना देखील स्वतःच्या जीवाची परवा सोडाच परंतु दुसऱ्यांचा जीवाची पर्वा न करता हुल्लड बाज पर्यटकां कढून होणाऱ्या गाड्यांच्या जीवघेण्या स्टंट विरोधात आता रोष व्यक्त होत असून अशा हुल्लड बाज पर्यटकांवरती महाबळेश्वर नगरपरिषद तसेच पोलीस प्रशासना मार्फत कारवाई होण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. याच बरोबर या परिसरात असे जीवघेणे स्टंट करण्यात मनाई असल्याचे फलक या भागात लावण्याच्या सूचना देखील होत आहेत.
फाशीचे Reel शूट झाले Real
अहिल्यानगरमध्ये रील करणे जिवावर बेतल्याचे दिसून आले आहे. एका तरुणाने फाशी बनवण्याचे रील शूट करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळेस त्याला खरोखरच फास बसला आहे. त्यामुळे त्याची प्रकृती चिंताजनक आहे. तरुणाची प्रकृती गंभीर असून, त्याला उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अहिल्यानगर हादरलं! फाशीचे Reel शूट झाले Real; तरुणाच्या जीवाशी आला खेळ, प्रकृती चिंताजनक
सोशल मिडियावर प्रसिद्ध होण्यासाठी रील शूट करताना एका तरुणाच्या जिवावर बेतले आहे. फाशीचे रील शूट करत असताना त्या तरुणाला अचानक गळ्याला फास बसला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचा जीव वाचला असला तरी त्याची प्रकृती गंभीर आहे.