वाहनांना लावलेले सायकल कॅरियरवर कारवाई होणार नाही परिवहन आयुक्तांचे आदेश (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्यामध्ये अपघात टाळण्यासाठी आणि सुरक्षित वाहतूक प्रवासासाठी अनेक नियम केले जात आहे. जुन्या गाड्या आणि गाड्यांचे नंबर प्लेट याबाबत देखील निर्णय घेण्यात आले आहेत. यानंतर आता गाड्यांच्या मागे लावण्यात येणाऱ्या सायकल कॅरीयरबाबत निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे वाहनांच्या पाठीमागे इतर वाहनांना कोणत्याही प्रकारे अडचण, अडथळा निर्माण होणार नाही, अशा प्रकारे बसवण्यात आलेल्या सायकल कॅरीअरद्वारे सामान वाहून नेत असल्यास, अशा वाहनांवर यापुढे कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येऊ नये, असे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळवले आहे.
पर्यावरणास अनुकूल, व्यायामाचे एक साधन त्याचप्रमाणे कोणत्याही भागाच्या शेवटच्या स्थानापर्यंत सहज जाता येते. याकरीता जगातील अनेक देशांमध्ये बरेचजण वाहनाचा वापर न करता सायकलचा वापर करत असतात, याकरीता बरेचसे वाहन धारक आपल्या वाहनाच्या पाठीमागे सायकल कॅरीअर बसवून त्याचा वापर सायकल वाहून नेण्यासाठी करत असतात. आपल्या देशातही वाहनधारक वाहनाच्या पाठीमागे सायकल कॅरीअर बसवून सायकल वाहून नेताना आढळतात.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मोटार वाहन कायदा व त्याअंतर्गत असलेल्या नियमात वाहनांच्या पाठीमागे सायकल कॅरीअर लावण्याबाबत कुठेही प्रतिबंध नाहीत, असे असतानादेखील अशा वाहनांवर परिवहन विभाग तसेच पोलीस विभाग यांच्या अंमलबजावणी पथकांमार्फत कारवाई केली जात असल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. यापुढे अशा सायकल कॅरीअरवर कुठलीही कारवाई होणार नाही, परिपत्रकात नमूद केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि वेळेत शाळेत पोहोचण्यासाठी पीएमपीएमएलच्या माध्यमातून बस सेवा उपलब्ध करून दिली जाते. २०२३–२४ या शैक्षणिक वर्षात एकूण ७२ बसगाड्या विद्यार्थ्यांच्या सेवेत होत्या, तर २०२४–२५ मध्ये हा आकडा वाढून ७९ वर गेला आहे. २०२३–२४ या वर्षीच्या आकडेवारीनुसार, पुणे महापालिकेच्या शाळांसाठी ४८ बसगाड्या, पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी १८ बसगाड्या, तर खाजगी उपक्रमांतर्गत ३ बसगाड्या विद्यार्थ्यांच्या सेवेत होत्या. याशिवाय, अटल बिहारी वाजपेयी कॉलेजला ३ बसगाड्यांची सोय करण्यात आली होती.
नवीन शैक्षणिक वर्ष २०२४–२५ मध्ये, पुणे महापालिकेच्या शाळांसाठी ५७ बसगाड्या, पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी २२ बसगाड्या, असे करून एकूण ७९ बसगाड्यांची सोय विद्यार्थ्यांच्या सेवेत करण्यात आलेली आहे. या बससेवेसाठी पीएमपीएमएलकडून ९२ रुपये प्रति किलोमीटर दराने संबंधित महापालिकांकडून भाडे आकारले जाते. ही सेवा केवळ विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठी मर्यादित असून, विशेषतः गोरगरीब आणि उपेक्षित वस्तीतील विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा ठरते.