नवी मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा पुरस्कार ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आला. ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan) आज प्रदान करण्यात आला. खारघरमध्ये वीस ते पंचवीस लाख अनुयायी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या पुरस्कारावेळी शाल, मानपत्र, 25 लाखांचा धनादेश आणि मानचिन्ह तसेच 10 फुटांचा गुलाबाचा हार, आप्पासाहेब धर्माधिकारी यांना श्रीसेवकांच्या वतीनं देण्यात आला. दरम्यान, व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (CM) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM), मंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार श्रीकांत शिंदे आदी नेते व मंत्री उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी मागील पंधरा दिवसांपासून जोरदार व जय्यत तयारी सुरु होती. राज्याच्या कानाकोपऱ्यातून धर्माधिकारी यांचे लाखोंच्या संख्येनं अनुयायी भर उन्हात खारघरच्या मैदानात बसले होते. डोळ्याचे पारणे फेडणार यावेळी हा जनसागर जमला होता. पुरस्कार घेतल्यानंतर आपल्या भाषणात बोलताना, आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी मोठी घोषणा केली आहे.
पुरस्काराची 25 लाखांची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला
हा माझ्या आयुष्यातल्या भाग्याचा क्षण आहे. कुठलाही पुरस्कार मोठाच असतो. हा कार्याचा गौरव आहे. नानासाहेबांनी जे कष्ट केले. श्री सदस्यांनी जे कष्ट केले, करतायेत, त्यांना याचं श्रेय जातं. महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देणं, एका घरात दुसऱ्यांदा देणं हे पहिल्यांदाच होतंय. हे महान कौतुक आहे. खेड्यांतून काम सुरु केलं. त्यामुळं या कामाची प्रसिद्धी कधी केली नाही. प्रसिद्धीमुळे काही मिळत नाही. मानवता हा सगळ्यात महत्त्वाचा धर्म आहे. असं आप्पासाहेबांनी म्हटलं. यावेळी मला जी पुरस्काराची 25 लाखाची रक्कम मिळाली आहे, ती सर्वच सर्व रक्कम मी मुख्यमंत्री सहायती निधीला देण्याचं जाहिर करतो, असं आप्पासाहेब धर्माधिकारी म्हणाले. यावेळी एकच टाळ्यांचा कलकलाट झाला.
आप्पासाहेबांच्या निर्णयाचे कौतूक…
दरम्यान, आप्पासाहेबांनी समाजात मोठे कार्य केले आहे, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, व्यसनमुक्ती, हुंडाबळी, नेत्रदान शिबिर आदी समाजपयोगी कामं आप्पासाहेबांनी केली आहेत. आप्पासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान समाजात माणसाला जगण्याचे ज्ञान देत आहे, जगण्याचे बळ देत असाताना, या प्रतिष्ठानला आर्थिक मदत गरजेचे आहे, पैसांची गरज असताना, आज महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या रुपाने 25 लाख रुपये मिळाले होते. मात्र हि सर्व रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याचा निर्णय आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी घेतला. अशी घोषणा त्यांनी केली आहे. त्यामुळं त्यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.