File Photo : Accident
सोलापूर : चार वर्षांच्या लहान बहिणीला कडेवर घेऊन मोठी बहीण ऊसाच्या फडात सुरू असलेल्या ट्रॅक्टरवर चढत असताना अचानक तिचा पाय गिअरवर पडला. यावेळी ट्रॅक्टर तसाच पुढे गेल्याने दोघी बहिणी खाली पडल्या. यावेळी ट्रॅक्टर त्यांच्या अंगावरून गेला. त्यामुळे या बहिणी गंभीररित्या जखमी झाल्या. त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मोहोळ तालुक्यातील आष्टे गावच्या हद्दीत घडली.
हेदेखील वाचा : आमिष दाखवत सायबर चोरट्यांकडून फसवणूक; तब्बल सव्वा कोटींचा घातला गंडा
ऊस तोडीच्या फडात शनिवारी (दि.7) सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास ही घटना घडली. निता राजू राठोड व अतिश्री राजू राठोड असे मृत झालेल्या दोन बहिणींची नावे आहेत. याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शानुबाई राजु राठोड (रा. पाटागुडा ता. जिवती जि. चंद्रपूर) या पती राजू राठोड मुली ज्योती, निता, अतिश्री, भाग्यश्री, गिता व एक मुलगा अभिनंदन असे एकत्रित राहतात. ते ऊसतोड मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
राजू राठोड हे लोकनेते साखर कारखाना अनगरच्या माध्यमातून ऊस वाहतुकीस असलेल्या ट्रॅक्टर सोबत ऊस तोडणीचे काम करतात. त्यामुळे अचानक गिअर पडून ट्रॅक्टर पुढे गेला. त्यामध्ये दोघीही खाली पडल्या. चालू असलेला ट्रॅक्टर दोघींच्याही अंगावरून गेला. यामध्ये त्या गंभीर जखमी होऊन जागीच मृत झाल्या.
दरम्यान, याप्रकरणी मुलींची आई शानुबाई राठोड यांनी ट्रॅक्टर चालक सुनील राठोड यांच्यावर स्वतःच्या ताब्यातील ट्रॅक्टर निष्काळजीपणे चालू ठेवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास अपघात विभागाचे पोलीस करत आहेत.
ऊस तोडणीचे काम होते सुरू
७ डिसेंबर रोजी सायंकाळी ६: १५ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी शानूबाई राठोड व त्यांचे पती राजु राठोड आष्टे (ता. मोहोळ) येथे कुंडलिक गावडे यांच्या शेतातील ऊस तोडणीचे काम संपल्यावर फडातील साहित्य गोळा करीत होते. ऊसाच्या बांधवर असलेला टॅक्टर हा चालक सुनिल गुलाब राठोड (रा. डिगरस ता. कंदार जि. नांदेड) याने तसाच चालू ठेवला होता. दरम्यान, त्या ट्रॅक्टरमध्ये निता राजु राठोड (वय २०), ही लहान बहिण अतिश्री (वय ४) हिला कंबरेवर घेऊन चढताना चालू असलेल्या ट्रॅक्टरच्या गिअरवर तिचा पाय पडला.
हेदेखील वाचा : Delhi Crime: मॉर्निंग वॉक करून घरी परत असताना व्यापाऱ्याची गोळ्या झाडून हत्या, नेमकं प्रकरण काय?