Photo Credit- Social Media मुंबई महापालिका निवडणुका
मुंबई: महाराष्ट्र विधानसभेत मोठा धक्का बसल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आता देशातील सर्वात श्रीमंत म्हणजेच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मुंबई महापालिकेवर कायम ही शिवसेना ठाकरे गटाची ताकद आणि वर्चस्व आहे. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने आज दुपाली 2 वाजता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात बैठक पार पडली. या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकांसदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनसार,मुंबईतील सर्व 36 विधानसभा मतदारसंघातील 227 प्रभागांमध्ये मंगळवारी (3 डिसेंबर) होणाऱ्या बैठकीपासून तयारीला सुरुवात होणार आहे. मुंबईत ठाकरे यांच्या पक्षाचे शिवसेनेचे आमदार नेते, सचिव आणि संघटक नेमले जाणार आहे. विनायक राऊत, अनिल परब, मिलिंद नार्वेकर, वरुण सरदेसाई, सुनील राऊत, सुनील शिंदे, अमोल कीर्तिकर यांच्यासह एकूण 18 सदस्यांची टीम प्रत्येकी बारा विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहे. येत्या आठवडाभरात हा अहवाल तयार करून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सादर केला जाईल. या अहवालाच्या आधारे महापालिकेच्या जागांचे वर्गीकरण करून पुढील निवडणुकीचा आराखडा तयार केला जाणार आहे.
Maharashtra New CM: गुजरातचे माजी मुख्यमंत्री जाहीर करणार महाराष्ट्राचा ‘मुख्य’मंत्री
विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचे मनोबल खचले आहे. पण आपल्या शिवसैनिकांचे मनोबल उंचावण्यासाठी उद्धव ठाकरे सातत्याने प्रयत्न करताना दिसत आहेत. अशातच आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या निवासस्थानी शिवसैनिकांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी शिवसैनिकांना उभारी देण्याचा प्रयत्न केला. महापालिका निवडणुकांच्या तयारी लागा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले आहेत. त्यासाठी त्यांनी आपल्या नेत्यांना महापालिका निवडणुकांची जबाबदारीही दिली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) मध्ये 2025 मध्ये निवडणुका होणार आहेत. बीएमसीमध्ये तीन वर्षांपासून निवडणुकाच झालेल्या नाहीत. गेल्या तीन वर्षांपासून महापालिका निवडून आलेल्या नगरसेवकांशिवाय कार्यरत आहे. 2022 च्या सुरुवातीला बीएमसीच्या 227 जागांसाठी निवडणुका होणार होत्या. पण राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडींमुळे आणि चढउतारांमुळे तेव्हापासून निवडणुका अद्याप बाकी आहेत.
Bharti-Harsh Anniversary: हर्ष आणि भारतीच्या लग्नाला कुटूंबाचा होता नकार
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ही भारतातील सर्वात श्रीमंत नागरी संस्था (महानगरपालिका) आहे. बीएमसीला 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 52,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त बजेट देण्यात आले होते. एवढा अर्थसंकल्प देशातील अन्य कोणत्याही महापालिकेला दिला जात नाही. एका अहवालानुसार, 2022 पासून 2024 च्या अखरेपर्यंत महापालिकेवर इक्बाल सिंग चहल आणि आता भूषण गगराणी याच्या देखरेखीखाली प्रशानस व्यवस्था सांभाळली. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती आणि भाजपच्या दणदणीत विजयानंतर, आता पक्षाने बृहन्मुंबई महानगरपालिकेत (बीएमसी) महत्त्वपूर्ण विजय मिळविण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
नागरी मंडळात बहुमत मिळवण्यासाठी भाजपने फेब्रुवारी 2023 मध्ये सुरू केलेल्या “मिशन 150” मोहिमेचे पुनरुज्जीवन केले आहे. मुंबई भाजपचे उपाध्यक्ष रवी राजा म्हणाले, ‘राज्यातील निवडणुकीच्या निकालांच्या आधारे आमचे लक्ष्य 150 नव्हे तर 175-180 जागांपर्यंत वाढले आहे.’
भाजपमध्ये दाखल झालेले रवी राजा यांनीही मुदतपूर्व निवडणुकांची मागणी केली. २०२५ पर्यंत या निवडणुका होऊ शकतात, असे त्यांनी सुचवले. त्याचवेळी भाजपचा वाढता प्रभाव हे शिवसेनेसाठी (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मोठे आव्हान आहे. मुंबईच्या राजकारणावर अविभाजित शिवसेनेचे दीर्घकाळ वर्चस्व आहे. पण अलिकडच्या वर्षांत शिवसेनेची ठाकरे गटाची महापालिकेवरील पकड कमकुवत झाली आहे, विशेषत: 2022 मध्ये UBT आणि एकनाथ शिंदे गटात विभाजन झाल्यानंतर. 2017 च्या बीएमसी निवडणुकीत, शिवसेनेने 84 जागा जिंकल्या आणि अपक्षांच्या पाठिंब्याने नियंत्रण राखले, तर भाजपने 82 जागा मिळवल्या होत्या.