कल्याण : पहिल्या जोरदार पावसाने (Heavy Rain) कल्याण डोंबिवली महापालिकेच्या (KDMC) नालेसफाईची (Drain Cleaning) पोलखोल झाली आहे. शहरातील विविध सखल भागात पाणी साचले आहे (Water has accumulated in low-lying areas). चाळीतील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांना पाण्याचा सामना करावा लागला आहे. विशेष म्हणजे डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्यात पाणी साचल्याने पोलिसांना देखील साचलेल्या पाण्यात पोलिस ठाण्याचा कारभार हाकावा लागला (Water has accumulated in Manpada Police Station, Dombivali).
अवघ्या दोन तासाच्या जोरदार पावसामुळे कल्याणच्या विविध भागात पावसाचे पाणी साचण्यास सुरुवात झाली. विशेषत: कल्याण पूर्व भागातील आडिवली ढोकळी परिसरात असलेल्या चाळींच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने अनेक नागरिकांना पावसाच्या पाण्याचा सामना करावा लागला. आडिवली ढोकळी परिसर जलमय झाला होता. या भागातील नाल्याचे काम केले गेले नसल्याची बाब माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी वारंवार प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली हाेती.
[read_also content=”भेटी लागी जीवा लागलीसे आस। पाहे रात्रंदिवस वाट तुझी।। https://www.navarashtra.com/web-stories/ashadhi-ekadashi-2023-importance-of-devshayani-ekadashi-in-marathi-nrvb/”]
मागच्या वर्षीही त्यांनी या प्रकरणी प्रशासनाचे लक्ष वेधले होते. यावर्षीही या परिसरात पावसाचे पाणी साचून ते नागरिकांच्या घरात शिरल्याने प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याची बाब पुन्हा एकदा उघडकीस आली आहे. मलंग रोडवर पावसाचे पाणी साचल्याने कल्याण मलंग रोडवरील रस्ते वाहतूक काही वेळेकरिता विस्कळीत झाली होती.
पावसाचे पाणी कल्याण शीळ रस्त्यावर वाहू लागल्याने या रस्त्यावरील वाहतुकही काही वेळेकरिता विस्कळीत झाल्याने या रस्त्यावर वाहतूक कोंडीचा सामना नागरीकांसह वाहन चालकांना करावा लागला. या वाहतूक काेंडीचा सामना शाळकरी बसेसना करावा लागला. त्यामुळे अनेक विद्यार्थी आज शाळेत उशिराने पोहचले. कारण पावसाच्या पाण्यामुळे झालेल्या वाहतूक कोंडीत बसेस काही वेळ खोळंबल्या होत्या.
[read_also content=”चॉकलेट खाण्याचे असेही आहेत आश्चर्यकारक फायदे, या प्रकरणांत करते औषधाचे काम https://www.navarashtra.com/web-stories/lots-of-wonderful-benefits-of-eating-chocolate-in-these-cases-it-works-as-a-medicine-see-the-details-here-nrvb/”]
कल्याण पूर्व भागातील तिसगाव गावठाण परिसर, शिवाजीनगर कॉलनी आणि नेतिवली परिसरातील चाळ परिसरात पाणी साचले हाेते. साचलेले पाणी काही चाळींच्या घरात शिरल्याने नागरिकांचे हाल झाले. कल्याण पश्चिमेतील रामबाग परिसरातील पाणी साचले होते. तसेच स्टेशन परिसरातील पाणी रस्त्यावरून वाहत होते. पावसाने जोर धरल्याने कामावर जाण्याऱ्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती.
डोंबिवली स्टेशन परिसरात पाणी साचल्याने काही दुकानात पाणी शिरल्याची घटना घडली. लोढा हेवन परिसरातही पाणी साचले होते. विशेष म्हणजे डोंबिवलीतील मानपाडा पोलिस ठाण्यात पाणी साचल्यााने पोलिसांना साचलेल्या पाण्यात पोलिस ठाण्याचा कारभार चालवावा लागला.
टिटवाळा परिसरातील इंदिरानगर, मांडा परिसरातील चाळीमध्येही पाणी साचले होते. या ठिकाणी रस्ताच नाही. जो काही कच्चा रस्ता होता. तो पावसाच्या पाण्यामुळे चिखलमय झाला आहे. त्यातून नागरीकांसह महिलांना चिखलाच्या रस्त्यातून वाट काढावी लागली.