काय घडलं नेमकं?
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेचे नाव लताबाई नाथा गांगुर्डे (60) असून घटनेतील मृत महिलेचे नाव रुपाली विलास गांगुर्डे (35) असे आहे. पोलिसांनी वालधुनी पुलाखाली रक्तबंबाळ अवस्थेत पीडितेच्या मृतदेह आढळून आला. ही घटना १ जानेवारी रोजी घडली. एवढेच नाही तर हत्येनंतर सासूने आपली सून बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. तक्रारदार महिलेने पोलिसांना दिलेली माहिती आणि सुनेच्या फोटोच्या आधारे त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली आणि हत्या झालेली महिला रुपाली असल्याचे स्पष्ट झाले.
का केली हत्या?
रुपालीचे पती विलास यांचा सप्टेंबर २०२५ मध्ये मृत्यू झाला. विलास रेल्वेमध्ये कार्यरत होते आणि त्यामुळे त्यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी रुपाली हिला ९ ते १० लाजग रुपयांची ग्रॅच्युएटी मिळाली. त्यानंतर, पीडितेची सासू नेहमी या पैश्यांची मागणी करत होती. रुपालीने ते पैसे देण्यास नकार दिला. एवढेच नाही तर विलास यांच्या निधनानंतर अनुकंपा तत्वावर नोकरी मिळवण्यासाठी आरोपी लताबाई यांना अर्ज करायचा होता. परंतु सुनेने स्वतः त्या नोकरीसाठी अर्ज केल्याने दोघांमध्ये वाद झाला.
याच वादातून आरोपी सासूने हत्येचा कट रचला. तिने तिच्या मित्रासोबत जगदीश म्हात्रे (60) याच्यासोबत मिळून रुपालीची निर्घृण हत्या केली. जेणेकरून त्यांच्यावर संशय येऊ नये यासाठी आरोपींनी मृतदेह वालधुनी पुलाखाली फेकून दिला. त्यांनतर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सून बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी या गुन्ह्याचा उलगडा केला असून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलिस पुढील करत असल्याची माहिती आहे.
सख्खा भाऊ बनला पक्का वैरी; शेतात पेटवलेल्या कांद्याचा जाब विचारल्याने लोखंडी वस्तूने मारहाण
Ans: सासू लाताबाई गांगुर्डेने तिच्या मित्राच्या मदतीने सुनेची हत्या केली.
Ans: नोकरी व ग्रॅच्युएटीच्या पैशांवरून सुरू असलेला वाद.
Ans: तपासाअंती दोन्ही आरोपींना अटक करून पुढील चौकशी सुरू आहे.






