रायगड लोकसभा मतदारसंघातून वंचित आपला उमेदवार उभा करणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होती. मात्र या चर्चेला आज पूर्ण विराम मिळाला असुन रायगड लोकसभेचा रिंगणात अखेर वंचित कडून प्रकाश आंबेडकर यांनी मराठा समाजाच्या कुमुदिनी चव्हान यांनाच उमेदवारी दिली आहे. त्यामुळे रायगड लोकसभेतील लढाई आता तिघांमध्ये होणार आहे. यामध्ये महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे, महा विकास आघाडीकडून अनंत गीते तर वंचीत कडून कुमुदिनी चव्हान अशी रंगत होणार असुन यामध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
रायगडमधील महाडयेथील उद्योजक रवींद्र चव्हाण हे युवा अस्मिता फाऊंडेशनचे डायरेक्टर आहेत. शिवाय कोकण विकास प्रबोधिनी ते संस्थापक अध्यक्ष आहेत. यांच्या पत्नी कुमुदिनी चव्हान या मराठा आहेत आणि त्या मराठा महासंघाच्या रायगड जिल्हा अध्यक्ष असून कोकण विकास प्रबोधिनी संस्थेच्या अध्यक्षा त्याबरोबरच महाड येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका देखील त्या आहेत. इतर उमेदवारांच्या तुलनेत उच्च शिक्षित आहेत. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार हा रायगड लोकसभेसाठी अनंत गीते आणि सुनिल तटकरे यांना अवघड ठरू शकतो का याकडे पाहणे तितकेच महत्वाचे ठरेल. दुसरीकडे मराठा समाजासाठी रस्त्यावर उतरणारे जरांगे पाटिल यांच्या आंदोलनामुळे अनेक मराठा समाजात तीव्र पडसाद उमटले आहेत. रायगड मधील मराठा समाजाचा विचार करता याचा फटका या निवडणुकीत विरोधकांना बसू शकतो.