वसई : डॉन को पकडना मुश्किल ही नही,नामुमकीन है। असे व्हाॅट्सआप काॅलवरून पोलीस निरिक्षकांना आव्हान देणा-या बलात्कारातील आरोपीच्या अखेर मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
नालासोपारातील १५ वर्षीय पीडित मुलगी बेपत्ता कोणाला काहीही न सांगता अचानक बेपत्ता झाली होती. त्यामुळे तिच्या पालकांनी तुळींज पोलीस ठाणे गाठून तक्रार केली असता, पोलीसांना तपासा अंती ती राजस्थानला मुळ गावी सापडली. तिला नालासोपारात आणून पोलीसांनी सखोल चौकशी केली. बलात्काराचा प्रकार उघड झाला. घटनेच्या दिवशी कामावरून लोकल ट्रेनने ती घरी जात असताना, प्रियकराने फोन करून वाढदिवस साजरा करण्याचे आमंत्रण दिले आणि तिला नायगाव रेल्वे स्थानकावर उरवून प्रियकर मुंबई अहमदाबाद हायवेवर असलेल्या हॉटेलमध्ये घेऊन गेला. तिथे जमलेल्या सर्व मित्र मैत्रिणीनी मिळून केक कापला आणि एकत्र जेवण केले. त्यानंतर सगळे जण आपापल्या घरी गेले. तर सदर मुलीला प्रियकराने आपल्या मित्राला त्याच्या कारमधून नालासोपारा येथे सोडण्यास सांगितले.
ही संधी साधून प्रियकराच्या मित्राने सदर मुलीला कारमधून निर्जनस्थळी नेऊन कारमध्येच बलात्कार केला. या प्रकारानंतर कसा तरी पळ काढून घर गाठले. दुसऱ्या दिवशी तिने घरी कोणालाही काहीही न सांगता राजस्थान गाठले अशी माहिती तिने पोलीसांना दिली. आरोपी तिला कारमध्ये जबरदस्तीने बसवत असताना तिने मोबाईलमध्ये ऑटोमॅटिक ऑडिओ रेकॉर्डिंग केले होते. याच ऑडिओ रेकॉर्डिंग आणि पीडितेच्या जबाबाच्या आधारे तुळींज पोलिसांनी बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला होता. मात्र, तो नेहमी आपला मोबाईल बंद ठेवत होता. गरज पडेल तेव्हा तो इतरांशी नेट कॉलिंगद्वारे संपर्क साधायचा. गेल्या एक महिन्यापासून पोलिसांशी लपाछपी खेळत होता. राहण्याची जागा ही तो वारंवार बदलत होता.
पोलीस आपला शोध घेत असल्याची माहिती मिळाल्यावर त्याने शोध घेणा-या तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांना व्हाट्सअप कॉल केला आणि डाॅन चित्रपटातील, डाॅन को पकडना मुश्कील ही नही नामुमुकीन है असा डाॅगलाॅग मारून, नगरकर यांना आव्हान दिले. त्यामुळे तुळींज पोलीस त्याचा मार्ग काढत होते. अखेर आरोपीने एकदा त्याच्या पत्नीशी मोबाईलवरून संपर्क साधला आणि पोलीसांच्या कचाट्यात सापडला. तुळींजच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलिसांनी मोबाईल ट्रेस करुन त्याला भाईंदर-उत्तन येथून ताब्यात घेतले. धनंजय दुबे उर्फ जय दुबे (४५) असे या आरोपीचे नाव असून, त्याला वसई न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
Web Title: Vasai virar nalasopara palghar crime news rajasthan rape vasai virar police maharashtra government thane mumbai crime news