ठाणे : राज्यात मान्सूनने उशिरा सुरुवात केली आहे. पण उशिरा सुरुवात केलेल्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील (MAHARASHTRA) बहुतांश जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळं शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. तसेच राज्यातील अनेक धरणं (DAM) व तलाव अद्याप कोरडी असल्याचं पाहायला मिळालं आहे. ज्या भागात चांगला पाऊस झाला आहे, तिथं धरणात पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर काही छोटी धरणं देखील भरली आहेत. राज्यातील काही धरणं व तलावात पावसामुळं पाण्याच्या पातळीत (WATER LAVEL) वाढ झाली आहे. त्यामुळे तिथल्या धरणातील काही दरवाजे खुले करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. अद्याप अनेक भागाकडे पावसाने पाठ फिरवली असल्यामुळे लोकांना अजूनही पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. मुंबई व ठाणेकरांना पाणी पुरवठ करणाऱ्या तलावात देखील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. तर विहार तलाव शंभर टक्के फुल्ल झाला आहे.
? मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांचा आज सकाळी ६ वाजेपर्यंतचा अहवाल
? Report of water stock in the seven lakes, supplying water to Mumbai, till 6am today.#MumbaiRains #MyBMCUpdates pic.twitter.com/5M913tQPpT
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 26, 2023
#WATCH | Maharashtra | Out of the 7 lakes that supply water to Mumbai, Tansa Lake started overflowing today at 4:35 am.
(Video Source: BMC) pic.twitter.com/X7ykWNL6et
— ANI (@ANI) July 26, 2023
मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटला
दरम्यान, मुंबईकरांना व ठाणेकरांना पाण्याची तहान भागवणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील अनेत तलाव धरणात पावसामुळं पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळं पुढील काही दिवस तरी पाण्याची चिंता मिटली आहे. मुंबईसह महाराष्ट्रात मागच्या दोन-चार दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. तलाव, नदी, नाले, धरणं दुथडी भरुन वाहू लागली आहेत. या पावसामुळे बळीराजा चांगलाच सुखावला आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत होता. पण आता महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी चांगला पाऊस होत आहे. त्यामुळे धरण सुद्धा भरुन वाहू लागली आहेत.
मुंबईतील तलाव व धरणांची स्थिती काय?
सध्या मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांपैकी विहार तलाव शंभर टक्के भरला आहे. तसेच तुळशी तलाव 100 टक्के भरला आहे. लवकर दुसरा तलाव तानसा भरुन वाहण्याची शक्यता आहे. सातत्याने पाऊस सुरु आहे, पावसामुळे धरण व तलाव फुल्ल भरून वाहण्याची शक्यता आहे. तसेच अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा आणि भातसा ह्या तलावात व धरण्यात लवकरच पाणी साठा वाढण्याची शक्यता असून, असाच पाऊस सुरु राहिल्यास काही तासातच शंभऱ टक्के पाणी भरेल, अंस पालिकेनं म्हटलं आहे.