पुणे : पदवीधर सिनेटच्या दहा जागांसाठी मतदान होणार असून सिनेट निवडणूकिसाठी राजकीय पक्षांनी सहभाग घेतल्यानंतर जशा नगरपालिका व महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आखाडा रंगतो अगदी तशाच प्रकारे सिनेट निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोप, पत्रकार परीषदा व निवडणूक प्रचार या सर्वांची रणधुमाळी पहायला मिळाली. महाविकास आघाडी प्रणित सावित्रीबाई फुले प्रगती पॅनल व भाजप प्रणित विद्यापीठ विकास मंच तसेच काँग्रेस प्रणित शाहू महाराज पॅनल या तीन पॅनलमध्ये प्रमुख लढत असून प्रत्येकाने आपल्या बाजूने प्रचार करत आपल्या आपल्या उमेदवारांचा जोरदार प्रचार केला आहे. शिवाय विद्यापीठ प्रशासनाने देखील मतदान निःपक्षपातीपणे व शांततेत नियोजनानुसार पार पडावे यासाठी जोरदार तयारी केली असून उद्या दहा उमेदवारांच्या निवडीसाठी नोंदणीकृत पदवीधर मतदान करणार आहेत.
मतदार कोण, केव्हा, कसे, कुठे करणार?
सिनेटच्या मतदानात पदवीधर गटासाठी रविवार (दि. २० नोव्हें.) रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील तब्बल एक लाख २० हजार पदवीधर मतदान करणार असून विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या तीन जिल्ह्यांतील ७१ मतदान केंद्रावर सिनेटचे मतदान होणार आहे.
मतदानासाठी आवश्यक
मतदानाला जाताना सोबत ओळखपत्र आवश्यक.
मतदान प्राधान्य क्रमाने म्हणजे मतपत्रिकेवर आपल्या उमेदवारांना पसंती क्रमांक देणे आवश्यक.
मतदानासाठी जाताना निवडणूक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक.
मतदानाची वेळ व वार
विद्यापीठाची सिनेट निवडणूक रविवारी (दि.२० नोव्हेंबर) रोजी ७१ मतदार केंद्रावर होणार असून वेळ : सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत असणार आहे. त्यासाठी
एकुण मतदार ८८,९००
एकुण मतदान केंद्रे : ७१
एकुण बूथ: ११४
असणार आहेत. या सिनेट निवडणुकीत एकूण ८८९०० मतदार आपले कर्तव्य बजवणार आहेत.
एकूण दहा जागांसाठी ३७ उमेदवारांचे अर्ज
पदवीधर मतदार संघातून अधिसभेच्या दहा जागांसाठी एकूण ३७ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले असून त्यामध्ये पाच खुल्या जागांसाठी १८ उमेदवार, एका अनुसूचित जाती प्रवर्गासाठी पाच उमेदवार, एका अनुसूचित जमाती प्रवर्गातील जागेसाठी ४ उमेदवार, विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील एका जागेसाठी ४ उमेदवार, इतर मागास प्रवर्गासाठी एका जागेसाठी चार उमेदवार तर महिला प्रवर्ग एका जागेसाठी दोन उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.
[blockquote content=”सावित्रीबाई फुले प्रगती पॅनल पुर्णपणे निर्विवादपणे निवडून येईल यात शंका नाही कारण आमचे कार्यकर्त्यांनी तीनही जिल्ह्यातील मतदांराशी उत्तम प्रकारे संवाद साधला आहे. आम्ही इलेक्ट्रॉनिक व सोशल मिडियाचा प्रचारासाठी पुरेपुर वापर केला आहे. त्यामुळे आमचे दहा पैकी दहा उमेदवार निवडून येतील ही खात्री आहे.” pic=”” name=”- प्रशांत जगताप, प्रचारप्रमुख, सावित्रीबाई फुले प्रगती पॅनल”]
[blockquote content=”विद्यापीठ विकास मंचच्या सर्वच उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावे आणि आम्हाला पुन्हा विद्यापीठाचा विकास व शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी संधी द्यावी.” pic=”” name=”- प्रसेनजित फडणवीस, मुख्य सिनेट उमेदवार, विद्यापीठ विकास मंच”]