वाल्मिक कराडच्या प्रकृतीबद्दल महत्त्वाची अपडेट (फोटो सौजन्य-X)
Walmik Karad News Marathi: बीड जिल्ह्यातील एका सरपंचाच्या हत्येशी संबंधित खंडणी प्रकरणात महाराष्ट्राचे मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी असलेले वाल्मिक कराड यांनी मंगळवारी पुणे पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. पोलिसांकडे जाण्यापूर्वी कराड यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. राजकीय सूडबुद्धीमुळे त्याचे नाव खून प्रकरणात जोडले जात असल्याचा दावा केला. बीडमधील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे ९ डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. बीड जिल्ह्यातील एका पवन ऊर्जा कंपनीकडून काही लोकांनी पैसे उकळण्याच्या प्रयत्नाला विरोध केल्यामुळे सरपंचाची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. याचदरम्यान आता केज तालुक्यातील मसाजोग येथील पवनचक्की प्रकल्प मॅनेजरला दोन कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी वाल्मिक कराड सध्या सीआयडी कोठडीत आहे. यादरम्यान त्याच्या डोळ्याला संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमागील सूत्रधार वाल्मिक कराड सध्या सीआयडीच्या कोठडीत आहे. केज तालुक्यातील मसाजोग येथील पवनचक्की प्रकल्प मॅनेजरला दोन कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी वाल्मिक कराड सध्या सीआयडी कोठडीत आहे.वाल्मिक कराड यांच्या डोळ्याला डोळ्याला संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांची एक टीम कराडच्या डोळे तपासणीसाठी गेली होती. यावेळी त्याचे डोळे तपासून औषधोपचार आणि ड्रॉप देण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. कस्टडीत असलेल्या वाल्मिक कराडची झोप पूर्ण होत नसल्याने डोळ्यांना संसर्ग झाल्याची डॉक्टरांनी सांगितलं असल्याची माहिती मिळत आहे.
वाल्मिक कराड गेल्या नऊ दिवसांपासून बीडच्या सीआयडी कोठडीत आहे. वाल्मिक कराड आज आजारी पडला. वाल्मिक कराडच्या डोळ्याला संसर्ग झाल्याची माहिती त्याच्यावर उपचार करणाऱ्या डाँक्टरांकडून देण्यात आली. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. बीड जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार सुरु आहेत. डॉक्टरांनी त्याला डोळ्यात टाकण्यासाठी ड्रॉप दिले आहेत. दरम्यान सीआयडीच्या कोठडीत वाल्मिक कराडवर उपचार सुरु आहेत. आज CID कडून त्याचा व्हॉईस सॅम्पल घेण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. व्हाईस सॅम्पल जुळल्यानंतर वाल्मिक कराडच्या अडचणीत आणखी वाढ होईल. दरम्यान, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज एक महिना उलटला. हत्या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. खंडणी प्रकरणात वाल्मीक कराड शरण आला. हत्याकांडातील आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. घटनेचा तपास CID आणि SIT कडून सुरू आहे.