अकोला : कोरोना संकटाच्या काळात अकोला, वाशिम जिल्हा रेडक्रॉस सोसायटीने केलेले कार्य प्रशंसनीय असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे. वाशिम जिल्हा रेड क्रॉस सोसायटीसाठी त्वरित जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी दिले आहेत. राज्यपाल कोश्यारी हे महाराष्ट्र रेड क्रॉस चे अध्यक्ष आहेत.
[read_also content=”Crimeथर्ड डिग्री! संशयीत आरोपीला उलटे करून मारले, अश्लील वर्तन केले; अकोल्यात सहा पोलीस निलंबित https://www.navarashtra.com/maharashtra/vidarbha/akola/third-degree-the-suspect-was-beaten-upside-down-engaged-in-obscene-behavior-six-policemen-suspended-in-akola-nrvk-23″]
राज्यपाल कोश्यारी यांनी अकोला रेड क्रॉसचे पदाधिकारी यांची भेट घेतली असून उपरोक्त निर्देश दिले आहेत. वाशिमचे जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांच्या पुढाकाराने अकोला व वाशिमचे रेड क्रॉसचे पदाधिकारी यांना महामहिम राज्यपाल यांनी भेटीसाठी बोलाविले होते. अकोला शाखेचे चेयरमन डॉ. किशोर मालोकार यांनी राज्यपाल कोश्यारी यांना स्मृतीचिन्ह देऊन त्यांचे स्वागत केले. तसेच, अकोला शाखेचे मानद सचिव प्रभजीत सिंह बछेर यांनी शाल भेट देऊन राज्यपाल कोश्यारी यांचे स्वागत केले.
[read_also content=”नागपूरविजेच्या झटक्याने बिबटयाचा मृत्यू तर, शेतमालक गजाआड काय आहे नेमकं प्रकरण ? https://www.navarashtra.com/maharashtra/vidarbha/nagpur/if-leopard-dies-due-to-electric-shock-what-exactly-is-the-case-with-farmer-gajaad-nraa-233674/”]
यावेळी, राज्यपालांना अकोल्यात तत्कालिन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर आणि विद्यमान जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांच्या मार्गदर्शनात केलेल्या कार्याचा आढावा देण्यात आला. कार्यकारी मंडळाचे सदस्य अॅड. सुभाष मुंगी यांनी राज्यपाल यांना रेड क्रॉसने चालविलेल्या सर्व उपक्रमांची माहिती पुस्तक स्वरूपात दिली. यावेळी, वाशिम जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी वसूमना पंत, जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह आणि उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे उपस्थित होते.