राजकीय वर्तुळात खळबळ; अजित पवार यांच्या प्रचार कार्यालयाला आग लावण्याचा प्रयत्न (Photo Credit- X)
आरोपील अटक
दरम्यान, प्रकरणात पोलिसांनी तपास करुन अवघ्या काही तासात संशयीत आरोपी बाळू उर्फ योगेश मुळे (४०, रा. कैलासनगर) याला अटक केल्याची माहिती जिन्सी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रविकिरण कदम यांनी दिली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे वार्ड अध्यक्ष योगेश गणेश शहाणे (२२) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, मयूर मोहनराव सोनवणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नगरसेवकपदाचे उमेदवार असून त्यांच्या प्रचारासाठी कैलासनगर येथील दत्तानगर भागात परवानगी घेऊन कार्यालय उभारण्यात आले होते. या कार्यालयासमोर मंडप टाकण्यात आला होता.
पाण्यासाठी अजून वर्षभर वाट बघा… संभाजीनगरमध्ये हे काय बोलून गेले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळें
सतर्कतेने आग आटोक्यात..
७ जानेवारी रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास परिसरातील नागरिक किशोर भुजबळ यांच्या निदर्शनास बाळू उर्फ योगेश मुळे हा व्यक्ती माचिसने मंडपाला आग लावताना आढळून आला. आरडा-ओरड होताच संबंधित व्यक्ती घटनास्थळावरून पळून गेला. तत्काळ गल्लीतील नागरिकांनी पाणी टाकून आग आटोक्यात आणली. या घटनेत मंडप व इतर साहित्य जळून अंदाजे ३० हजार रुपयांचे नुकसान झाले.
सीसीटीव्ही फुटेजने आरोपीला बेड्या
घटनेनंतर प्रचार कार्यालयात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यांचे फुटेज तपासण्यात आले असता, एक लाल टी-शर्ट घातलेला व्यक्ती मंडपाला आग लावताना दिसून आला. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी बाळू उर्फ योगेश मुळे याला ताब्यात घेत अटक केली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसवे वार्ड अध्यक्ष योगेश गणेश शहाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






