फोटो सौजन्य - बीसीसीआय सोशल मिडिया
Ruturaj Gaikwad’s century in Vijay Hazare Trophy : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत शतक झळकावूनही, ऋतुराज गायकवाडला न्यूझीलंडविरुद्धच्या संघातून वगळण्यात आले. गायकवाडची फलंदाजी थांबलेली नाही. ऋतुराज सध्या २०२५-२६ विजय हजारे ट्रॉफीमध्ये महाराष्ट्र क्रिकेट संघासाठी स्फोटक खेळी खेळत आहे. गोवाविरुद्धच्या नाबाद शतकासह गायकवाडने ऑस्ट्रेलियन दिग्गजाला मागे टाकत इतिहास रचला.
गोव्याविरुद्धच्या सामन्यात महाराष्ट्राने फक्त २५ धावांत ५ विकेट गमावल्या. कर्णधार ऋतुराज गायकवाडने डाव सावरला आणि १३१ चेंडूत १३४ धावांची महत्त्वपूर्ण नाबाद खेळी केली. या खेळीत गायकवाडने ८ चौकार आणि ६ उत्तुंग षटकार ठोकले, ज्यामुळे त्यांच्या संघाने ५० षटकांत ७ विकेट गमावून २४९ धावा केल्या. या नाबाद खेळीमुळे गायकवाडची लिस्ट ए सरासरी ५८.८३ पर्यंत वाढली आणि ऑस्ट्रेलियन दिग्गज मायकेल बेवनला मागे टाकले. गायकवाडने आतापर्यंत ९५ लिस्ट ए डाव खेळले आहेत, ज्यामध्ये २० शतके झळकावली आहेत.
🚨 RUTURAJ GAIKWAD SMASHED 134* (131) IN THE VIJAY HAZARE TROPHY. 🚨 – Maharashtra were 52/6 at one stage, then the captain stepped up. Rutu, despite playing such crucial knocks, will be ignored by the selectors. 💔 pic.twitter.com/Wj2RZto3U3 — Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 8, 2026
सरासरीच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर पोहोचण्यासोबतच, ऋतुराज गायकवाडने लिस्ट ए क्रिकेटमध्ये ५००० धावाही केल्या आहेत. शिवाय, गायकवाड आता विजय हजारे ट्रॉफीमध्ये सर्वाधिक शतके करणारा संयुक्त आघाडीचा फलंदाज बनला आहे. अंकित बावणेने १०१ डावांमध्ये १५ शतके केली आहेत. दुसरीकडे, ऋतुराज गायकवाडने फक्त ५९ डावांमध्ये ही कामगिरी केली आहे. सरासरीच्या बाबतीत, गायकवाडने मागील सामन्यात विराट कोहलीलाही मागे टाकले.
१) ऋतुराज गायकवाड – १५
२) अंकित बावणे – १५
३) देवदत्त पडिकल – १३
४) मयंक अग्रवाल – १३
या खेळीसह, ऋतुराज गायकवाडने लिस्ट ए क्रिकेटमध्ये ५००० धावा पूर्ण केल्या आहेत. तो आता लिस्ट ए क्रिकेटमध्ये ५८.८३ च्या सरासरीने सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मायकेल बेवनचा विक्रम मोडला आहे.
🚨 HISTORY BY RUTURAJ GAIKWAD 🚨 – Ruturaj Gaikwad has the highest average in List A history, overtaking Micheal Bevan. 🤯 Rutu has 58.83 Average from 95 matches in List A. pic.twitter.com/Fts7UX5E3M — Johns. (@CricCrazyJohns) January 8, 2026
महाराष्ट्राने २ धावांत तीन विकेट गमावल्या असताना गोव्याविरुद्ध ऋतुराज गायकवाड फलंदाजीला आला. विकेट पडणे एवढ्यावरच थांबले नाही. महाराष्ट्राचा अर्धा संघ २५ धावांवर बाद झाला आणि त्यांचा सहावा विकेट ५२ धावांवर आला. त्यानंतर रुतुराज गायकवाडने विकी ओस्तवाल (५३) सोबत शतकी भागीदारी करत संघाला मोठी धावसंख्या गाठून दिली. गायकवाड शेवटपर्यंत नाबाद राहिला आणि त्याने १३१ चेंडूत आठ चौकार आणि सहा षटकारांसह १३४ धावा केल्या. विजय हजारे ट्रॉफीमधील गायकवाडचे हे १५ वे शतक होते. महाराष्ट्राने गोव्याला २५० धावांचे लक्ष्य दिले आहे.






