मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील कर्जत दिशेकडे रेल्वे कडून कारशेड उभारले जात आहे.मध्य रेल्वे 2021 मध्ये वसई विरार भागात कारशेड उभे राहिल्यानंतर कर्जत मार्गावर नवीन कारशेड उभारण्यास मंजुरी दिली आहे.मध्य रेल्वेवरील सर्वात मोठे कारशेड बनणार असून साधारण सात ते आठ किलोमीटर अंतरात हे नवीन कारशेड असणार आहे.या कारशेडच्या कामाला सुरुवात झाली असून मातीचा भराव टाकून जमीन सपाट करण्याचे काम केले जात आहे. मात्र त्या कामासाठी बाहेरून आणली जाणारी माती सध्या चर्चेचा विषय बनली आहे.सध्या भिसेगाव भागातून माती आणली जात असून दररोज शेकडो ब्रास माती तेथे टाकण्यात येत आहे.मात्र बाहेरून उचलली जाणारी मातीसाठी शासनाच्या महसूल विभागाला स्वामित्व शुल्क म्हणजे रॉयल्टी भरावी लागते.परंतु भिसेगाव येथील मातीच्या खोदकामाला जेमतेम रॉयल्टी भरली असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे शासनाचा महसूल बुडवून रेल्वेच्या कामासाठी मातीचा भराव टाकला जात आहे. कारशेड साठी दररोज माती घेऊन येणाऱ्या ट्रकसाठी खास रस्ता बनविण्यात आला आहे,त्याच रस्त्यासाठी काही शे ब्रास माती लागली आहे.
भिसेगाव येथून काढली जाणारी माती ही अल्प रॉयल्टी भरून कारशेड चे ठिकाणी आणली जात होती आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी तक्ररी केल्या आहेत. त्यानंतर आता डिकसळ येथील डोंगर फोडून माती काढली जात असून लोणावळा येथील ट्रक ती माती डिकसळ डोंगर येथून सावरगाव अशी वाहतूक करीत आहेत.या वाहतुकीस माती खोदकाम ज्या ठिकाणी केली जात आहे त्या डोंगराच्या मागील बाजूस पाली भूतीवली धरण शासनाने दीडशे कोटी रुपये खर्चून बांधले आहे. त्यामुळे धरणाच्या डोंगरात खोदकाम करून धरणाच्या जलाशयाला धोका निर्माण झाला आहे. त्याचवेळी माती ज्या ठिकाणावरून काढून वाहतूक केली जात आहे. त्या मातीबाबत देखील स्थानिक शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला आहे.त्याचवेळी शासनाला रॉयल्टी भरली आहे काय? हे देखील गुलदस्त्यात असून शासनाचा कर बुडवून तेर्थे माती उत्खनन केली जात असल्याचा आरोप केला जात आहे.महसूल विभाग याबाबत काही हालचाली करणार आहे काय? असा सवाल स्थानिक चिंचवली गावातील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.






