बीड : बीड जिल्ह्यातील केज (Kej) येथे अंत्यविधीसाठी स्मशानभूमीची दुरावस्था असल्याने मृतदेहाची अवहेलना झाल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस कोसळत आहे. अशातच एका व्यक्तीचा अंत्यविधी करण्यासाठी मृतदेह स्मशानभूमीत आणण्यात आला होता. दरम्यान, यावेळी स्मशानभूमीची दुरावस्था असल्याने जवळपास चार तास हा अंत्यविधी करण्यासाठी लागला आहे.
स्मशानभूमीच्या छतातून पाणी गळत असल्याने अंत्यविधी रोखण्यात आला होता. जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेक स्मशानभूमीची अशीच दुरावस्था दिसून येत आहे. दरम्यान, या स्मशानभूमीची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.






