वारणेचा 240 मेगावॉट वीजनिर्मिती जलविद्युत प्रकल्प चंदगडला (फोटो सौजन्य-X)
कोल्हापूर : कोल्हापुरात गेल्या आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. या पावसामुळे वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येत आहे. यामुळे कृष्णा, वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होताना दिसत आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 10.6 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात दिवसभर पावसाची उघडझाप सुरू होती. मात्र, अधूनमधून जोरदार सरी कोसळत राहिल्या.
सध्या धरणक्षेत्रातही पाऊस सुरू असून, दूधगंगा धरण ५० टक्के भरले आहे. राधानगरी धरण ६५ तर वारणा ७० टक्के भरले आहे. शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी, आजरा, गगनबावडा तालुक्यांत तुलनेत अधिक पाऊस आहे. रविवारपासून वातावरणात बदल झाला असून, पावसाने पुन्हा सुरुवात केली आहे. सकाळपासून अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. सकाळी आठ वाजता संपलेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी १०.६ मिलिमीटर पाऊस झाला.
सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात
सर्वाधिक पाऊस ३५.० मिलिमीटर गगनबावडा तालुक्यात झाला. धरणक्षेत्रातही सरासरी ४५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. राधानगरी धरणातून प्रतिसेकंद २३४८ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वारणा धरणातून ९१०९ तर दूधगंगा धरणातून ४७७५ घनफूट पाणी नदीमध्ये येत असल्याने नद्यांची पातळी दिवसभरात स्थिर राहिली आहे.
पंचगंगा नदीची पातळी २७.०८ फुटांवर कायम
राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. त्यात कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पातळी २७.०८ फुटावर कायम आहे. अद्याप ३२ बंधारे पाण्याखाली आहेत. आगामी दोन दिवसांत पाऊस वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
धरण भरल्याची टक्केवारी
वारणा ७० %, राधानगरी ६५ %, दूधगंगा ५०% ही धरणे क्षमतेने भरली आहेत. घटप्रभा, जांबरे, सर्फनाला, कोदे.धरण – क्षमता (टीएमसी) – सद्याचा पाणीसाठा राधानगरी – ८.३४ – ५.४३ तुळशी – ३.४१ – २.१७वारणा – ३४.३९ – २४.०१ इतके भरले आहे.
पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी तुरळक पाऊस होताना दिसत आहे. काही भागांत पावसाचा जोर ओसरला असला तरीही कोकण, घाटमाथ्यावर पावसाच्या सरी कोसळत आहेत. कोकण, घाटमाथ्यासह पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानुसार, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.