आणखी एका रेल्वेमार्गाची निर्मिती केली जाणार; संभाजीनगर-पुणे प्रवास आता साडेचार तासांत होणार (फोटो सौजन्य - pinterest)
प्रवासादरम्यान प्रवासी खानपान सेवा, तिकिट चेकिंग आणि इतर बाबींबाबत रेल्वेच्या रेल मदत अॅप वर तक्रारी करतात. या तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यात पश्चिम रेल्वे देशात पहिल्या क्रमांकावर आहे. गेल्या एप्रिल महिन्यात तक्रार निवारण्याचे प्रमाण ८.२९ टक्के होते. त्यात आता ४० टक्यांनी घट होउन हे प्रमाण फेब्रुवारी महिन्यात ४.९७ टक्यांवर आले आहे. रेल्वे मदत अॅपद्वारे दररोज प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी सर्वाधिक प्राधान्य दिले जाते. या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे, पश्चिम रेल्वेला तक्रारींचे लवकरात लवकर निराकरण करण्यात यश आल्याने पश्चिम रेल्वेला २०२३-२४ वर्षासाठी तक्रार निवारण कार्यक्षमता निर्देशांक (GREI) स्कोअर ०.९६ सह सर्व विभागीय रेल्वेंमध्ये अव्वल स्थान प्राप्त केले आहे.
३ महिन्यांत १,३५६ मद्यपी चालक जाळ्यात, वाहतूक पोलिसांची कारवाई
मदतसेवेसाठी ‘वॉर रूम’
पश्चिम रेल्वेने सर्व सहा विभागांमध्ये रेल्वे मदत सेवेसाठी ‘वॉर रूम’ स्थापन केला आहे. रिअलटाइम आधारावर प्रवाशांच्या तक्रारी किंवा समस्यांवर लक्ष ठेवले जाते. पश्चिम रेल्वेने २०२३ मध्ये जवळपास ४७,१२० तक्रारींसह ११७० दशलक्षाहून अधिक प्रवाशांना हाताळले .२०२४ मध्ये, सुमारे १२४७ दशलक्ष प्रवासी आणि ४१६८० तक्रारीचे निवारण केले.
रेल्वे प्रवाशांच्या काय आहेत तक्रारी ?
प्रवासी सुविधा, स्थानकांची स्वच्छता, स्थानक/गाड्यांवरील स्वच्छतागृहांची स्वच्छता, केटरिंग आणि वेंडिंग सेवा, स्थानकांवर तक्रार निवारणाची तत्परता, आरक्षित डब्यांमध्ये अनधिकृत प्रवासी प्रवेश करणे, ऑनबोर्ड ओबीकेईपी हाऊसची तत्परता, ऑनबोर्ड सेवा कर्मचारी.