कल्याण – अमजद खान : काही दिवसापूर्वी कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. त्या जागेवर सकाळी एक बेवारस बॅग आढळून आल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले. मात्र ही बॅग जेव्हा ट्रफिक पोलिसांनी उघडून पाहिल्यावर त्यात काही रोकड आणि दागिने होते. वाहतूक पोलिसांनी प्रवाशाला शोधून त्याची बॅग त्यांच्या हवाली केली आहे.
आज सकाळच्या सुमारास कल्याण पश्चिमेकडे स्टेशन परिसरात एस्केलेटर शेजारी एक बॅग बेवारस रित्या पडली होती. काही नागरिकांचे लक्ष गेलं त्यांनी याबाबत लगेचच असलेले वाहतूक पोलीस ट्राफिक पोलिसांना माहिती दिली. वाहतूक पोलीस कर्मचारी व ट्रॅफिक वॉर्डनने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. बॅगेची झडती घेतली असता बॅगेमध्ये नवीन कपडे, चांदीचे दागिने ते 30 हजार रोकड असल्याचं आढळले. त्यामुळे पोलिसांचा नागरिकांनी देखील सुटकेचा विश्वास सोडला वाहतूक पोलिसांनी या बॅगमलकाचा शोध सुरू केला.
बॅगेत असलेल्या कागदपत्रांच्या सहाय्याने वाहतूक पोलिसांनी बॅगमालकाला संपर्क केला. लक्ष्मीदास गुप्ता असे या प्रवासाचे नाव होतं. आज सकाळी पत्नी व मुलासह तो उत्तरप्रदेशहुन कल्याणला आला होता. रेल्वे स्थानकातून उतरल्यानंतर घरी जाण्याची घाई असल्याने बॅग स्टेशन वर विसरला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे गुप्ता यांना आपली बॅग परत मिळाली त्यामुळे त्यांनी वाहतूक पोलिसांचे आभार मानले. वरिष्ठ पोलीस अधिकारी राजेश शिरसाठ यांनीदेखील ट्राफिक वॉर्डन व वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांचे कौतुक केलं.