Photo Credit- Social Media (महाविकास आघाडीत जागावाटपात उशीर का होतोय)
नागपूर: लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील तीनही पक्षांमध्ये जागावाटपावरून मोठे मतभेद उफाळून आले होते. सांगलीवर काँग्रेसने दावा केला असतानाही ठाकरे गटाने परस्पर उमेदवार जाहीर केला. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार विशाल पाटील यांनी बंडखोरी करत निवडणूक लढवली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांची नाराजी असलेल्या मतदारसंघांचा अद्याप निर्णय झालेला नाही. अशा काही जागांसंबंधी लवकरच एकत्र बसून तोडगा काढला जाईल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले आहे.
लोकसभा निवडणुकीत सांगलीच्या जागेवर सुरुवातीपासूनच काँग्रेसने दावा केला होता. पण उद्धव ठाकरे गटाने परस्पर उमेदवार दिल्याने काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली होता. त्यामुळे आघाडीतील नेत्यांचीही कोंडी झाली. वाटाघाटी सुरू असतानाही शिवसेनेने उमेदवार माग घेण्यास नकार दिला. त्यामुळे विशाल पाटील यांनी बंडखोरी केली आणि निवडणूक लढवली आणि विजयी झाले.
हेही वाचा: संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा स्ट्रीट स्टाइल सोया मोमो, योग्य पद्धत जाणून घ्या
विधानसभा निवडणुकीत मात्र जागा जास्त असल्याने तीनही पक्षांमध्ये मोठे मतभेद आहेत. जागावाटपावरून महाविकास आघाडीत बिघाडी होऊ नये, यासाठी प्रत्येक पक्ष योग्य ती खबरदारीही घेत आहे. विशेष म्हणजे अद्याप कोणत्याही पक्षाने परस्पर उमेदवार जाहीर केलेला नाही. कार्यकर्त्यंचा असंतोष असलेल्या जागावरील उमेदवार अद्याप जाहीर केलेला नाही. पण अशा जागांवर लवकरात लवकरत तोडगा काढला जाईल, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.
एआयएमआयएमने 28 जागांसाठी प्रस्ताव दिला, असे विचारले असताना नाना पटोले म्हणाले, याबाबत अद्याप मला माहिती नाही. माझ्याकडे असा प्रस्ताव घेऊन कोणीही आलेले नाही. पण उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीतून बाहेर पडल नसून त्यांना जाणीवपूर्वक बाहेर काढले जात असल्याचा टोलाही नाना पटोले यांनी लगावला.
हेही वाचा:महायुतीतील ‘या’ घटक पक्षाने केली 20 जागांची मागणी; वरिष्ठ नेत्यांचे टेन्शन वाढले